४ आरोपी ताब्यात, २७ लाखांचा मुद्देमाल जप्त
पवनार (Petrol-diesel Theft) : सेवाग्राम पोलिसांनी गस्तीदरम्यान पवनार येथील शाही तडका धाब्याजवळ बेकायदेशीर पेट्रोल व डिझेल घेऊन जाणाऱ्या ४ आरोपींना ताब्यात घेतले. मारोती इको गाडीत प्रत्येकी 20 लिटरचे १२ पेट्रोल (Petrol-diesel Theft) आणि ८ डिझेलचे प्लास्टिक कॅन तसेच एक टँकर आणि बुलेट मोटरसायकल जप्त करण्यात आले. एकूण सुमारे ४०० लिटर पेट्रोल-डिझेल व वाहने, अंदाजे २७ लाख रु.मूल्याचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
स्थानिकांच्या लक्षात न आल्यामुळे हा गैरप्रकार काही दिवसांपासून सुरू होता. सेवाग्राम ठाणेदार ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI बांबर्डे आणि टीमने घटनास्थळी कारवाई केली.