राज्य महामार्ग ६१ वर रेणापुर पाटी जवळ घटना
पाथरी (Pathari Accident) : पिकअप व दुचाकी यांच्या समोर समोर झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना (Pathari Accident) आज गुरुवार २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील रेणापूर गावाजवळ घडली आहे .
अपघाता विषयी मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील रेणापूर पाटीजवळ राज्य महामार्ग ६१ वर गुरुवार २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३ च्या सुमारास पाथरीच्या दिशेने येणारे पिकअप क्रमांक एमएच २६ सीएच १६१९ व विरुद्ध दिशेने जाणारी दुचाकी क्रमांक एमएच २२ एक्यु ०९२३ यांच्यात समोरासमोर जोराची धडक होत अपघात झाला. यावेळी दुचाकी वरील प्रदीप दगडोबा शिंदे (वय ३५ ) रा.विटा (खु) ता . सोनपेठ याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे त्याचा जागीच मृत्यू झाला. (Pathari Accident) घटनेनंतर पाथरी पोलिसांना माहिती देण्यात आली होती . घटनास्थळी पोना . सुरेश कदम पोह. अशोक धस दाखल झाले होते. यावेळी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाथरी ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे .