वृक्षारोपण करुन पर्यावरणाला अनुकूल वातावरण निर्माण होते!
रिसोड (Plantation) : रिसोड शहरातील अनित्य स्मशान भूमीत ‘फादर डे’ दिनाचे अवचित्त साधून व स्व वसंतराव खंडारे यांच्या नावाने विठाई मायनाॅरिटी बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या (Vithai Minority Multipurpose Institution) वतिने अनित्य स्मशान भूमीत दि 15 रोजी वृक्षारोपण (Plantation) करण्यात आले. विठाई मायनाॅरिटी बहुउद्देशीय प्रतिष्ठान संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवत असुन, जसे व्यसनमुक्ती मेळावे, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, गोर-गरीब लोकांना मदत करण्यासाठी काम करीत आहे. हे वृक्षारोपण करुन पर्यावरणाला अनुकूल वातावरण निर्माण होते. वृक्षारोपण करताना यावेळी उपस्थित विठाई मायनाॅरिटी बहुउद्देशीय प्रतिष्ठान संस्थचे अध्यक्ष प्रदिप वसंतराव खंडारे, भगवान जुमडे, जियाउर खान, आकाश जुमडे, आकाश जाधव, सुनिल पंडित व संस्थेचे पदाधिकारी (Office Bearer) उपस्थित होते. तरी वेगवेगळे उपक्रम (Activity) राबविण्यासाठी दानशूर व्यक्तींनी संस्थेला मदत करावी. जेणे करून आपल्या मदतीने चांगले उपक्रम राबविण्यासाठी मदत होईल. असे आवाहन विठाई मायनाॅरिटी बहुउद्देशीय प्रतिष्ठान संस्थचे अध्यक्ष प्रदिप खंडारे यांनी केले.