“हे काम पूर्ण झाले नाही तर मिळणार नाहीत पैसे”
नवी दिल्ली (PM Kisan Yojana) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच 2000 रुपयांचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाऊ शकतो. जर तुम्ही आवश्यक कागदपत्रे पूर्ण केली असतील तर हा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात हस्तांतरित केला जाऊ शकतो. गेल्या वेळी 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी जारी करण्यात आला होता. ज्यामध्ये कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा झाला होता.
फेब्रुवारीमध्ये 19 वा हप्ता जारी झाल्यानंतर, आता केंद्र सरकार जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पुढील हप्ता देण्याची तयारी करत आहे. परंतु जर ई-केवायसी आणि आधार लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर हा हप्ता देखील अडकू शकतो. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांनी त्यांची माहिती वेळेत अपडेट करणे आणि पोर्टलला भेट देऊन स्थिती तपासत राहणे महत्वाचे आहे. ही (PM Kisan Yojana) योजना आतापर्यंत देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी मदत ठरली आहे.
पीएम किसान योजना म्हणजे काय?
पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी योजना सुरू करण्यात आली. याअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा 2000 रुपयांची मदत दिली जाते, म्हणजेच एकूण 6000 रुपये. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात, जेणेकरून ते शेतीशी संबंधित त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतील.
पुढील हप्ता कधी येणार?
पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 220 वा हप्ता जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जारी होण्याची अपेक्षा आहे. तथापि, त्याची अधिकृत तारीख सरकारने अद्याप जाहीर केलेली नाही. शेतकऱ्यांना वेळोवेळी पीएम किसान वेबसाइटला भेट देऊन अपडेट्स तपासत राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.




 
			 
		

