बुलढाणा (Poetry Mahotsav) : स्थानिक विदर्भ महाविद्यालय बुलढाणा येथे झालेल्या राज्यस्तरीय कविता महोत्सवामध्ये कविते संदर्भात पाच विविध सत्रांच्या आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये राज्यस्तरीय कवींचे कवी संमेलन, विद्यार्थ्यांचे कवी संमेलन, बहुभाषिक कवी संमेलन, महिलांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.
बहुभाषिक कवी संमेलनामध्ये (Poetry Mahotsav) विविध भाषेतील उर्दू, इंग्रजी, हिंदी, आणि मराठी अशा कविता सादर करण्यात आल्या या सत्राचे अध्यक्ष डॉ. गणेश गायकवाड होते. तर प्रा स्वाती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्य कुठे, तुळशीराम मापारी, संदीप राऊत, अर्चना बोंद्रे यांनी आपल्या कविता सादर केल्या.
महिलां कवी संमेलन च्या अध्यक्षपदी संभाजीनगर येथील कवयित्री मा. रचना पाथर्डी ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती डॉ. वैशाली निकम सौ.लता टेकाळे व प्रा. डॉ. संगीता पवार यांची होती. (Poetry Mahotsav) कवयित्रीनी आपले स्त्री भावविश्व, जीवनानुभव रंगवणाऱ्या कविता कवी संमेलनामध्ये सादर केल्या. मधुरानी बनसोड यांनी “माणुसकी येथे नष्ट होत आहे कबीराचे दोहे गिरवा रे! … असा संदेश दिला तर वेदनांच्या उंबऱ्यावर नाही पूर्ण आयुष्य तुझे म्हणत ज्योती शिंगारे यांनी कविता सादर केली.
त्याचप्रमाणे डॉ.माधुरी चाटे व रेशमा गवारे यांनी आपल्या कवितेतून स्त्री विश्व साकार केले प्रा. अंजली गाडे, डॉ. मंजुराजे जाधव, संजीवनी हाडे यांनी आपल्या सुंदर कविता यावेळी सादर केल्या. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. वैशाली निकम यांनी ” आई प्रज्वलित करते लेकीच्या मनातला चैतन्याचा, ऊर्जेचा, प्रेमाचा दिवा अन तिच्या आकाशात विसावतो.
आठवणींच्या चांदण्यांचा थवा” असं मायलेकीचं प्रेम कवितेतून रेखाटलं तर प्रा. डॉ. संगीता पवार यांनी”प्रेम ओलाव्यासाठी आतुरले होते मी
का तुजसाठी उगाच रक्त आटवले होते मी” अशी अशी खंत व्यक्त करणारी प्रेम कविता सादर केली. काव्यवैफिलीचा निरोप घेतांना सूत्रसंचालक वैशाली तायडे यांनी “लाड केले तुम्ही पण त्रास होतो आम्हाले, खरं सांगा सासूबाई पटतं का हो तुम्हाले”, असा मजेदार सासूशी संवाद साधत कविता सादर करुन रसिकांची दाद मिळवली.




