Washim news :- शेतातील पिकावर विषारी द्रव्याची फवारणी करताना एकास विषबाधा झाली. सोहेल खान सलाम खान (२३, रा. माळीपुरा) असे त्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोहेल खान हे २५ जून रोजी खेर्डा रस्त्यावरील शेतातल्या पिकावर फवारणी करत असताना त्यांना दुपारच्या सुमारास विषबाधा (Poisoning) झाली. त्यांना उपचारासाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) आणण्यात आले होते. मात्र प्रथमोपचार करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले आहे .