चोंडी ते वाई रस्त्यावरील चोंडी टी-पॉईंट जवळील घटना
औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात कार्यरत होते
आंबाचोंडी (Police Accident) : वसमत ते औंढा नागनाथ रोडवरील चौंडी टि पॉईंट जवळ असलेल्या कल्याणी बार जवळ औंढा नागनाथ पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले विनायक सुपेकर हे कर्तव्यावर असताना औंढा नागनाथ वरून वसमतकडे जात असताना अपघातात जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडला. मयत विनायक सुदामराव सुपेकर (३७) रा.खांडेगाव ता वसमत हे औंढा नागनाथ पोलीस स्टेशन येथे पोलीस अंमलदार या पदावर कार्यरत होते.
सदरील कर्मचारी हे १९ डिसेंबरच्या रात्री ११ ते २ वाजेच्या दरम्यान समन्स देण्यासाठी औंढा नागनाथ वरून वसमतकडे आपल्या दुचाकीवर जात असताना अचानक वाई-चोंडी दरम्यान कल्याणी बार जवळ त्याचा अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले. यातच त्याचा मृत्यू झाला. (Police Accident) घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय अधिकारी वसमत केंद्रे, कुरुंदा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामदास निरदोडे, जमादार बालाजी जोगदंड , गजानन भालेराव, ज्ञानेश्वर ठोंबरे आदींनी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला.