Chandrapur :- विरुर-मुंडीगेट या मध्ये रेल्वेने प्रवास करणारा एक २४ वर्षीय युवक १६ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० च्या सुमारास रेल्वेतून (train) खाली पडल्याची माहिती विरुर पोलिसांनी मिळाली. सदर मार्गावर घनदाट जंगल असल्याने त्या भागातून कोणतेही वाहन जाऊ शकत नव्हते. अश्यावेळी पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता ३ किमी अंतर पायी तुडवत त्या युवकाचा मृतदेह रात्रीच्या किर्र अंधारात शोधून काढला व मृतदेहाला (Dead body) दोरीने बांधून पोलिस स्टेशन येथे आणण्यात आले. सदर मृत युवकाची माहिती घेतली असता तो बिहार राज्यातील असल्याचे कळले. त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु असून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येथे ठेवण्यात आले आहे.
रेल्वेतून पडल्याने झाला मृत्यू, विरुर पोलिसांची कामगिरी
राजुरा तालुक्यातील येत असलेल्या विरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दक्षिण मध्य रेल्वे लाईनच्या ऑफलाइनवर पोल क्रमांक १६२/५ जवळ जंगल परिसरातील विरुर वरुन तिन किलोमीटर अंतरावरील जंगल परिसरात अज्ञात व्यक्ती वय अंदाजे २४ रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष वाकडे यांनी आपल्या सहकार्यासह रात्री ९:३० वाजताच्या दरम्यान पाऊस सुरु असतांना रस्ता पायी तुडवत तीन किलोमीटरचा प्रवास पार करुन घटनास्थळी पोहचून पाहणी केली. सदर मृताचा मर्ग दाखल करून मृताची ओळख पटविण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल करण्यात आले. सदर कामगिरी पार पाडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक दत्ता जाधव, पोलीस हवालदार विजय मुंडे, राहुल वैद्य, हर्षल लांडे, अविनाश बोरुले, धम्मदीप भळके, गजानन चारोळे, सौरभ पगळपल्लीवार, काकासाहेब काकडे यांनी अथक परिश्रम घेतले.