गोबरवाही पोलिसांची कारवाई
गर्रा/बघेडा (Trolley Stolen Case) : तुमसर तालुक्यांतर्गत येणार्या डोंगरी बुज. येथील रेल्वे स्टेशनजवळील शिव मंदिर जवळ ठेवलेली ट्रॅक्टर ट्रॉली चोरीला गेली. त्याचा शोध गोबरवाही पोलीस घेत असतांना सदर (Trolley Stolen Case) ट्रॉली चोरी करणार्या आरोपीच्या ताब्यातून हस्तगत केली. यात गोबरवाही पोलिसांची कारवाई उल्लेखनीय ठरली व त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
शेतीच्या कामासाठी किरायाने निळ्या रंगाची विना क्रमांकाची ट्रॅक्टर ट्रॉली किंमत ७० हजार रुपयांची ७ हजार रुपयाप्रमाणे अंकेश महेश साखरे रा.अर्जुन टोला ता. तिरोडी, जि. बालाघाट, (म.प्र.) यांचे कडून आणली होती व लोभीवरुन गोबरवाहीला शेतीच्या कामाकरीता त्यांचे ट्रॅक्टर क्र.एमएच ३६ झेड २१४२ नी त्यांनी किरायाने आणलेली विनाक्रमांकाची निळ्या रंगाची ट्रॉलीसह जात असतांना डोंगरी बुज. येथील (Trolley Stolen Case) रेल्वे स्टेशन शिवमंदिराजवळ ट्रॉलीचा चाक पंचर झाला असता रेल्वे स्टेशनजवळ सदर ट्रॉली ठेऊन दुसर्या दिवशी ठेवलेली ट्रॉली आणण्याकरीता गेला असता तिथे ठेवलेली ट्रॉली मिळून न आल्याने कुणीतरी अज्ञात इसमाने सुनामोका पाहून चोरुन नेल्याचे फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरुन गोबरवाहीचे ठाणेदार यांनी गुन्हा दाखल केला व अज्ञात आरोपीचा शोध घेणे सुरु केले.
गुन्ह्याच्या तपासात आरोपीचा शोध घेऊन स्वास्तिक बिसने रा.डोंगरी बुज. ता. तुमसर, यांचे घरी चोरी गेलेली विनाक्रमांकाची निळ्या रंगारी ट्रॉली मिळून आल्याने व गुन्ह्यात वापरलेला ट्रॅक्टर मुंडा अंदाजे किंमत ४ लाख, असा एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचा माल आरोपीच्या ताब्यातून हस्तगत करुन पोलीस स्टेशन गोबरवाही येथे जमा करण्यात आला. (Trolley Stolen Case) सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिक्षक भंडारा/तुमसर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पोलीस निरीक्षक शरद शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गिते, पो.हवा. कडव, पोना गणेश बांते, पोशि ठाकरे, हे करीत आहेत.