Pandharkawda :- कर्तव्यावर जात असलेल्या पोलीस कर्मचार्यावर त्याच्याच साळ्याने चाकु हल्ला (Attack)करुन जख्मी केल्याची घटना तालुक्यातील करंजी रोड येथे उडाण पुलाजवळ घडली. याबाबत जख्मी पोलीस कर्मचारी शशिकांत गजबे यांनी पोलीसात दिलेल्या तक्रारी वरुन पोलीसांनी त्यांचा साळा कार्तीक नारनवरे याच्या विरुध्द गुन्हा (Crime) दाखल केला आहे.
चाकुने वार करुन जिवानिशी मारण्याचा प्रयत्न
यातील जख्मी पोलीस कर्मचारी(Police) वर्धा येथे पोलीस वायरलेस मॅन या पदावर काम करतो. तर आरोपी हा मारेगांव येथील न्यायालयात लिपीक पदावर कार्यरत आहे. ते दोघेही पांढरकवडा येथुन आपआपल्या ड्युटीच्या ठिकाणी ये-जा करीत असतात. घटनेच्या दिवशी गजबे हे वर्ध्यासाठी तर नारनवरे मारेगांवला जाण्यास निघाले होते. त्यांची करंजी रोड येथील उडाण पुलाजवळ अचानकपणे समोरा,समोर भेट झाली. दोघांमध्ये असलेल्या जुण्या वादातुन त्यांच्यात तेथे बाचाबाची झाली. ही बाचाबाची इतकी विकोपाला गेली कि कार्तिकने गजबेवर चाकुने वार करुन जिवानिशी मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शशिकांत गजबे हे गंभीर जख्मी झाले. त्यांना पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरीता भरती करण्यात आले. त्यांच्या फिर्यादी वरुन पोलीसांनी कार्तिक नारनवरे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.




