हृदय विकाराने निधन!
मानोरा (Police Officer) : तालुक्यातील पारवा (मोहगव्हाण) येथील मुंबई येथे सीआयडी विभागात इन्स्पेक्टर (CID Department Inspector) म्हणून कार्यरत असलेले देवराव हजारे (वय 46) यांचा दि. 17 ऑगस्ट रोजी मुंबई येथे हृदय विकाराने निधन झाले. दुसऱ्या दिवशी त्यांना राहत्या गावी पोलिसांनी सलामी देवून अंत्यसंस्कार केले.
पोलीस पथक व मानोरा तालुक्याचे पोलीस कर्मचारी हजर!
मुंबई येथे पोलीस विभागात (Police Department) देवराव हजारे कार्यरत होते. त्यांची 8 दिवसांपूर्वी सीआयडी इन्स्पेक्टर म्हणून नियुक्ती झाली होती. हजारे यांची दि. 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 12 वाजताच्या सुमारास हृदयविकाराने (Heart Disease) मृत्यू झाला. त्यांना त्यांची जन्मभूमी असलेले गाव पारवा येथे 18 तारखेला संध्याकाळी आणण्यात आले. व त्यांच्या शेवटचा निरोप देण्यात आला. सलामी (Salute) देण्याकरिता वाशीम येथील पोलीस पथक (Police Squad) व मानोरा तालुक्याचे सुद्धा पोलीस कर्मचारी हजर होते. हजारे यांच्या मृत्यूची बातमी कळताच तालुक्यात व गावात शोककळा पसरली आहे.