Arni :- ठाणेदार निलेश सुरडकर पोलीस स्टॉप सह पेट्रोलिंग करीत असताना गवना शेत शिवार येथे सार्वजनिक ठिकाणावर गजानन विठ्ठलराव विटेवरी (४१) रा. जवळा, दिलीप दत्तात्रय कुंद्रपरवार (३८) रा. ब्राह्मणवाडा, चक्रधर पांडुरंग विखे (४८) रा. जवळा, विठ्ठल बळीराम निरपाशे (६५) रा. जवळा, संजय ज्ञानेश्वर एकंदर (४०) रा. जवळा, प्रवीण भिकाजी चव्हाण (३९) रा. जवळा, साहेबराव हाऊसिंग चव्हाण (४२), रा. शिरपूर इत्यादी जण गोलाकार बसून जुगार (Gambling) खेळताना मिळून आले.
७ जणाविरुद्ध गुन्हे दाखल, २ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
त्यांच्या जवळ नगदी ९५३८ रुपये व मोबाईल सात नग ६१ हजार रु.पाच मोटरसायकल किंमत १ लाख ७० हजार रु. असा एकूण २,४०,५३८ रु. मुद्देमाल सार्वजनिक ठिकाणी मिळून आला. सदर कारवाई ठाणेदार सुरडकर यांच्या मार्गदर्शना नुसार, जमादार सतीश चौधर, पो.हे.का गुणवंत बोईनवाड, नितीन वास्टर, पोलीस नाईक नफीस शेख, राम ढाकणे, पोलीस शिपाई आकाश गावंडे यांनी केली.