दसरा समिती अन् पत्रकार क्रिकेट संघाचा पुढाकार
हिंगोली (DPCL Tournament) : दसरा प्रीमियर क्रिकेट लीग स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात पोलीस संघाने डॉक्टर इलेव्हन संघाचा पराभव करीत डीपीसीएल चषकावर नाव कोरले. तर डॉक्टर संघ उपविजेता ठरला. दसरा समिती आणि पत्रकार क्रिकेट संघाच्या पुढाकारातून क्रिकेट सामन्याची सुरुवात करण्यात आली. त्यानुसार डोळ्याचे पारणे फिटावे असे भरगच्च नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार (DPCL Tournament) क्रिकेट सामने सुरु झाले मात्र मध्यंतरी दोन तीन दिवस पावसाने थैमान घातले त्यामुळे सामने पुढे ढकलण्यात आल्याने नियोजनात बदल करावा लागला.
येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर शुक्रवारी चार संघात सेमी फायनल सामने खेळविण्यात आले यात डॉक्टर इलेव्हन संघाने पालिकेचा पराभव करीत अंतिम फेरीत मजल मारली तर पोलीस संघाने व्यापारी संघाचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात टॉस जिंकत डॉक्टर संघाने फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला अन तो निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. दुसर्याच (DPCL Tournament) षटकात डॉक्टर इलेव्हन संघाने दहा धावा घेत एक गडी गमावला,मात्र पोलीस संघाच्या भेदक मार्यापुढे आणि चपळ क्षेत्ररक्षनामु ळे डॉक्टर इलेव्हन संघाचे एकेक गडी तंबूत परतले, जवळ पास आठ षटकात डॉक्टर इलेव्हन संघाने ७० धावा काढू शकला. त्यानंतर पोलीस संघाने शानदार फलंदाजी करीत ७० धावांचे लक्ष पार करीत पोलीस संघाने दसरा प्रीमियर क्रिकेट लीग स्पर्धेचे दसरा महोत्सवाचे अजिंक्य पद पटकावले.
यापूर्वी देखील (Hingoli Police team) पोलीस संघाने शिवजयंती निमित्य घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत देखील अंतिम सामना एकहाती जिंकत अजिंक्य पद पटकावले होते. सुरुवाती पासूनच पोलीस संघ हा बलाढ्य संघ म्हणून ओळखत होता. अखेर त्यांनी साखळी, सेमीफायनल, मध्ये विजय मिळवीत अंतिम सामन्यात ही प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारवित स्पर्धेचे अजिंक्य पद पटकावले. तर डॉक्टर संघ हा उपविजेता ठरला या संघाला ट्रॉफी देऊन गौरवीण्यात आले. तर तिसरे पारितोषिक व्यापारी संघाला देण्यात आले. या सामन्याचे पंच म्हणून शेख इम्रान,शेख साबीर यांनी केले तर त्यांना बाबुराव ढोकणे रमेश वाबळे सुनील नागरे संतोष आठवले यांनी मदत केली. गुणलेखकचे काम रॉबिन तर धावते समलोचन हिंदी मधून राकेश भट तर मराठी मधून प्रद्मुन गिरीकर, गोपालराव सरनायक, सुमित जैन यांनी केले.
यावेळी (Hingoli Police team) पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जगजितराज खुराणा, दसरा समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे, विलास गोरे यांच्या हस्ते विजेत्या पोलीस संघाला ट्रॉफी आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे कर्णधार शिवाजी मेटकर, व्यवस्थापक सुनील पाठक, मदन शेळके, प्रसाद आर्वीकर, सुधीर गोगटे, सुधाकर वाढवे, दिलिप हळदे, विजय गुंडेकर, हरपालसिंग सेठी, प्रीतम राठोड,प्रकाश इंगोले , चंदू वैद्य, निलेश गरवारे, राजेंद्र हलवाई आदींची उपस्थिती होती. क्रिकेट स्पर्धा यशस्वीते साठी पत्रकार संघातील सर्व खेळाडूंनी परिश्रम घेतले.