भंडारा तुमसर मार्गावरील वरठी रेल्वेपुलावरील घटना
मोहाडी (Van-Bike Accident) : तुमसरच्या दिशेने येणार्या भरधाव मारुती वैनने समोर येणार्या दुचाकीला जबर धडक दिली. यात एका पोलिसांसोबत एक व्यक्ति जखमी झाला आहे. सदर घटना ११ ऑगस्टला साय ५ वाजेदरम्यान भंडारा तुमसर मार्गावरील वरठी रेल्वेपुलावर घडली. चंदन चकोले (३४) रा तुमसर असे जखमी पोलीस शिपाईचे नाव आहे. तर हेमंत धार्मिक (४०) रा. खात रोड भंडारा असे दुसर्या जखमी युवकाचे नाव आहे. धडक देऊन वैन चालक पसार झाला. (Van-Bike Accident) जखमी वर भंडारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
भंडारा येथील पोलीस मुख्यालयाअंतर्गत कार्यरत चंदन चकोले व हेमंत धार्मिक दोघेही दुचाकी असलेली एक्टिवा क्रमांक एमएच ४० सीजे ५६३० ने भंडाराकडून तुमसरच्या दिशेने जात होते. सायं. ५ वाजेच्या सुमारास वरठी येथील रेल्वेपुलावरून जात असतांना समोर येणार्या मारुती वैन क्रमांक एमएच ३४ के ९३०४ ने एक्टिव्हाला समोरून जबर धडक दिली. (Van-Bike Accident) धडक देऊन वैन पुलाखाली उतरून सनफ्लॅगच्या भिंतीला धडकली.
धडकेत दुचाकीस्वार दोघेही खाली कोसळले. अपघातामुळे दोघेही गंभीर जखमी झाले होते. माहिती मिळताच वरठी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश गिरी आपल्या ताफ्यासहित घटना स्थळी दाखल झाले. जखमीना उपचारासाठी भंडारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Van-Bike Accident) अपघातात पायाला गंभीर इजा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. धडक देऊन मारुती वैन चालक मात्र घटना स्थळावरून पसार झाला. वैन चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास वरठी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश गिरी यांच्या मार्गदर्शनात वरठी पोलीस करीत आहे.
वरठी रेल्वेपुल घेणार किती बळी?
वरठी येथील रेल्वेपुलावर नेहमीच अपघात होत असतात. सदर पुल अत्यन्त अरुंद असून पुलावर मोठया प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरु असते. शिवाय रस्ता समतोल नसून रस्त्याची पार दुरावस्था झाल्याचे दिसून येते. सदर रस्त्यावर झालेल्या अपघातामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे.
६ मार्च ला झालेल्या (Van-Bike Accident) अपघातात एकलारी येथील एका दहा वर्षीय निरागस मुलीचा जीव गेला. यावेळी सदर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी प्रशासनाने रस्ताचे काम मंजूर असल्याचे सांगितले. मात्र पाच महिने लोटूनही कुठलेच काम सुरु झाले नाही. सतत होणार्या रस्त्याबाबत नागरिकांत प्रचंड रोष दिसून येत आहे.
नितीन गडकरीचे ३४ कोटी कुठ गेले?
भंडारा- तुमसर रस्त्यासाठी ३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितली. काम लवकरच सुरु होणार असल्याचेही सांगितले. मात्र अद्याप काम सुरु झाले नाही. भंडारा तुमसर मार्गावर प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक खासदार व आमदाराचे कुठलेच लक्ष नाही. लोकप्रतिनिधींना निवडून आल्यानंतर जनतेला होणार्या त्रासाचा जणू विसर पडला की काय असं वाटते.