मानोरा (Prof. Kabaddi Akash Chavan) : प्रो. कब्बड्डी स्पर्धेत राज्यपातळीवर आकाश बाबाराव चव्हाण यांनी विशेष प्राविण्य मिळाल्याबद्दल समाजातर्फे दि. २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानी देवठाना येथे सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी रा. कॉ. शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. श्याम जाधव, माजी सभापती जयकिसन राठोड , माजी जि. प. सदस्य भाऊ नाईक, शिवसेना उबाठा पक्षाचे माजी जि.प.सदस्य डाँ. सुभाष राठोड, टी.व्ही.राठोड, विनोद राठोड, अभिजीत राठोड, खेमसिंग चव्हाण, अरविंद चव्हाण, शेतकरी नेते मनोहर राठोड, श्याम राठोड, वसंत राठोड, बादल राठोड यांनी सत्कारमुर्ती आकाश चव्हाण यांचे सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. (Prof. Kabaddi Tournament) कार्यक्रमाचे प्रास्ताविक वानखडे, तर संचालन गोपाल चव्हाण यांनी केले. आभार प्रदर्शन मनोज राठोड यांनी केले. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.