७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गडचिरोली (Tobacco Factory) : महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सु्गंधित तंबाखुचे उत्पादन करीता आरमोरी तालुक्यातील डार्ली येथे लावलेल्या अवैध कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकुन प्रतिबंधित सुगंधित तंबाखुा कारखाना उध्वस्त केला. पोलिसांनी घटनास्थळावरुन एकूण ०७,८४,२०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही (Tobacco Factory) कारवाई काल २ सप्टेंबर रोजी करण्यात आली.
याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोली यांनी पोलीस स्टेशन आरमोरी येथे आरोपीतांविरुद्ध अपराध क्रमांक ०३४८ / २०२५ कलम-५९ (i),२६(२) (i), २६ (२) (iv), २७ (३) (T), ३ (१) (zz) (iv) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम-२००६ सहकलम ३(५), २७५, २७४, २२३, १२३ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपी ओमप्रकाश शंकर गेडाम याला पोलीसांनी अटक केली आहे. तसेच इतर चार आरोपी फरार असून त्यांचा शोध घेणे सुरु आहे. (Tobacco Factory) सदर गुन्हाचा पुढील तपास पोउपनि. संतोष कडाळे हे करीत आहेत