वकील बार मंडळाचे तहसीलदार यांना निवेदन
मानोरा (Pahalgam Terrorist attack) : जम्मू काश्मीर पहलगाम येथे दहशत वाद्यनी निष्पाप हिंदूवर गोळीबार केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये असंख्य निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला तसेच या घटनेमुळे देशभरात मोठ्या प्रमाणात दहशतीचे (Pahalgam Terrorist attack) वातावरण निर्माण झाले. पाक धार्जिन्या अतिरेक्यांनी पर्यटकावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दि. २४ एप्रिल रोजी वकील बार असोशिएशन संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केले आहे की, जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात भारतीय नागरिकांची झालेली हत्या या क्रूर घटनेचा निषेध नोंदवून भारत सरकारने झालेल्या घटनेचा बदला घेऊन अतिरेकी दहशतवादीना (Pahalgam Terrorist attack) कठोर शिक्षा करावी. निवेदन देतेवेळी विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड जी. आर. राठोड, उपाध्यक्ष ॲड एस एन पखाले, सचिव ॲड इंगोले, सहसचिव ॲड अग्रवाल, सदस्य ॲड आर डी ठाकरे, ॲड एन पि चौधरी, ॲड रेखाते, ॲड चव्हाण, ॲड पटेल, ॲड मनवर, ॲड पाटील, ॲड कांबळे आदी उपस्थित होते.