जिल्ह्यात 15 खरेदी केंद्र निश्चित
हिंगोली (Hingoli district) : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत एनसीसीएफच्या वतीने खरीप हंगाम 2024-25 मध्ये मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले असून, येथे खरेदीसाठी दि. 24 जानेवारीपासून नोंदणी सुरु झाली आहे. तसेच खरेदी केंद्रावर दि. 13 मेपर्यंत तूर खरेदी करण्यात येणार आहे.
तूर खरेदी (Tur price) करण्यासाठी (Hingoli district) जिल्ह्यात 15 खरेदी केंद्र निश्चित केली आहेत. त्या ठिकाणी नोंदणीला सुरुवात झाली आहे. खरेदी केंद्राचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. कयाधु शेतकरी उत्पादक कं. मर्या. तोंडापूर ता. कळमनुरी या संस्थेचे खरेदी केंद्र वारंगा फाटा व कळमनुरी येथे आहेत. वारंगा फाटा येथील केंद्र चालक मारोती कदम (9736449393) तर कळमनुरी येथे महेंद्र माने (9689229393) हे आहेत.
हजरत नासरगंज बाबा स्वयंसेवी सेवा सहकारी संस्था म. हिंगोली या संस्थेचे खरेदी केंद्र येहळेगाव ता. औंढा नागनाथ येथे आहे. येथे केंद्र चालक शेख गफार शेख अली हे (9881501040) आहेत. प्रगती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, हिंगोली या संस्थेचे खरेदी केंद्र हिंगोली येथे आहे. येथे केंद्रचालक नारायणराव देशमुख हे (9850792784) कामकाज पाहणार आहेत.
औंढा नागनाथ तालुका (Hingoli district) सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. औंढा (ना) या संस्थेचे खरेदी केंद्र जवळा बाजार ता. औंढा नागनाथ येथे आहे. या संस्थेवर केंद्र चालक कृष्णा हरणे हे (9175586758) आहेत. श्री संत नामदेव स्वयंरोजगार सहकारी संस्था म. चोरजवळा या संस्थेचे खरेदी केंद्र कन्हेरगाव ता. जि. हिंगोली येथे आहे. या संस्थेवर केंद्रचालक अमोल काकडे हे (8007386143) आहेत.
विजयलक्ष्मी बेरोजगार सहकारी संस्था म. कोळसा ता. सेनगाव या संस्थेचे खरेदी केंद्र साखरा ता. सेनगाव येथे आहे. केंद्र चालक उमाशंकर माळोदे हे काम पाहणार आहेत. त्यांना 9403651743 क्रमांकावर संपर्क साधावा. श्री संत भगवानबाबा स्वयंरोजगार सेवा संस्था कोथळज या संस्थेचे खरेदी केंद्र सेनगाव येथे आहे. केंद्र चालक निलेश पाटील (9881162222) हे असून, वसमत तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित, वसमत या संस्थेचे खरेदी केंद्र वसमत येथे आहे. केंद्र चालक सागर इंगोले हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 8390995294 असा आहे. गोदावरी व्हॅली फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. शिवणी खु. ता. कळमनुरी येथे आहे. केंद्र चालक कैलास ढोकणे हे आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 7447758312 असा आहे.
श्री. फाळेश्वर महाराज फार्मर प्रोड्यूसर कंपनी या संस्थेचे खरेदी केंद्र फाळेगाव येथे आहे. या संस्थेवर केंद्र चालक म्हणून मारोती वैद्य हे असून, त्यांचा संपर्क क्रमांक 9975055731 असा आहे. मान्यता फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. या संस्थेचे खरेदी केंद्र नागासिंगी येथे आहे. या संस्थेवर केंद्र चालक म्हणून संदीप काकडे हे असून, त्यांचा संपर्क क्रमांक 9823252707 असा आहे. सप्तरंग ग्रेन फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. या संस्थेचे (Tur price) खरेदी केंद्र आडगाव येथे आहे. या संस्थेवर केंद्र चालक म्हणून कल्याण गायकवाड हे असून, त्यांचा संपर्क क्रमांक 9511686882 असा आहे. वाबळे अँड ऑदर फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. या संस्थेचे खरेदी केंद्र उमरा येथे आहे. या संस्थेवर केंद्र चालक म्हणून सत्यभामा वाबळे ह्या असून, त्यांचा संपर्क क्रमांक 8805975604 असा आहे. श्री बेलेश्वर महाराज फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. या संस्थेचे खरेदी केंद्र पुसेगाव येथे आहे. या संस्थेवर केंद्र चालक म्हणून माधव गाडे हे असून, त्यांचा संपर्क क्रमांक 9423737672 असा आहे.
शेतकरी बांधवांनी आपल्या (Hingoli district) तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी संपर्क करुन नोंदणी करावी. नोंदणीसाठी सोबत खरीप हंगाम 2024-25 मधील सातबारावर ऑनलाईन पीकपेरा नोंद असावा. आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबूक झेरॉक्स सोबत आणावे. बँक पासबुकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड स्पष्ट असावा (जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये). संबंधित तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी तूर हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकारी , परभणी / हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.




