नागरीक आणि नावाड्यांची धाव; सुदैवाने कोणतीही जिवितहानी नाही
परभणी (Purna river Incidents) : पूर्णा तालुक्यातील निळा येथे विवाह सोहळ्यासाठी येणार्या पाहुण्यांची नाव पूर्णा नदी पात्रात उलटली. ही घटना मंगळवार २० मे रोजी सकाळी ११.३० ते १२ या दरम्यान घडली. नावेमध्ये असलेले पाच ते सहाजण बचावले. सुदैवाने या (Purna river Incidents) घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. या विषयी मिळालेली अधिक माहिती अशी की, निळा येथे मुलींचा विवाह सोहळा होता. या सोहळ्यासाठी सातेफळ, कात्नेश्वर, आहेरवाडी, नांदेड आदी भागातुन पाहुणे आले होते. कानडखेड मार्गे पूर्णा नदी नावेच्या मदतीने पूर्णा नदी ओलांडत असताना अचानक नाव उलटली. नावेतील सर्वजण पाण्यात पडले.
आरडाओरड सुरु झाली. यावेळी नदी किनारी उपस्थित असलेल्या नागरिकांनी व इतर नावाड्यांनी प्रसंगावधान राखत मदतीसाठी धाव घेतली. पाण्यात पडलेल्या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. (Purna river Incidents) पाण्यात पडलेली दुचाकीही बाहेर काढण्यात आली. नदी काठाजवळ नाव उलटल्याने मोठा अनर्थ टळला. नदीच्या मध्यभागी नाव उलटली असती तर मोठी जीवीतहानी झाली असती. नशिब बलवत्तर होते म्हणुन नावेतील सर्वजण वाचले.
पावसाळ्यात प्रवास करणे धोकादायक
सध्या लग्नसराईचा काळ सुरु असून मोठ्या प्रमाणात सोहळे आयोजीत केले जात आहेत. लग्न सोहळा, इतर धार्मिक किंवा सामाजिक कार्यासाठी ग्रामस्थांना मौजे निळा येथे येण्यासाठी नदीपात्रातून नावमधून प्रवास करावा लागतो. (Purna river Incidents) ग्रामस्थांना देखील तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पावसाळ्यात होडीचाच वापर करावा लागतो. पावसाळ्यात तर नदीपात्रातून प्रवास करणे धोकादायक आहे. प्रशासनाने ग्रामस्थांच्या सोयीसाठी पर्यायी मार्ग सुरु करण्याची मागणी होत आहे.




 
			 
		

