सामाजिक तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या गुन्हेगारावर लक्ष ठेवण्यासाठी असा कामी येईल तिसरा डोळा
पुसद (Pusad Crime) : कोणत्याही घटनेवरून समाजात तेढ निर्माण होईल व शहरातील वातावरण तणावग्रस्त होईल असे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी “तिसरा डोळा “कार्यरत झालेला आहे. आणि याचा सकारात्मक परिणाम आज दि. 19 जुलै रोजी शहरात दिसून आलेला आहे. कुण्या तरी कारणावरून एका विशिष्ट समाजाच्या वतीने शासनाला निवेदन देऊन कारवाईची मागणी करत असताना शहरात तणाव कसा निर्माण होईल याकडेही काही समाजकंटकांनी लक्ष वेधले होते.
मात्र “तिसऱ्या डोळ्याची नजर अशा गुन्हेगारांवर होतीच ” म्हणूनच का विशिष्ट समाजाच्या लोकांनी कोणतीही मोठे धाडस करण्याची हिंमत केली नाही. हे यश खरं बघितलं तर तिसऱ्या डोळ्याचे राज्यासाठी व शहरासाठी अत्यंत उपयुक्त ठरलेला हा उपक्रम. सातत्याने कायम ठेवावा. जेणेकरून समाजातील काही (Pusad Crime) गुन्हेगारांची धाडस होणार नाही एवढे मात्र खरे. शहर हे मागील काही वर्षा अगोदर घडलेल्या घटनांपासून शासन दप्तरी अति संवेदनशील शहर म्हणून नोंदल्या गेलेले आहे. शहरातील भौगोलिक व राजकीय व आर्थिक परिस्थिती बघता व आगामी येणारे सण उत्सव व भविष्यात कुठलाही शहरात अनुचित प्रकार घडू नये, त्याला वेळीच पायबंध घालता यावा. याकरिता (Pusad City Police) पोलीस प्रशासनाने केलेल्या मागणीनुसार गृह मंत्रालयाने औरंगाबाद येथील एका कंपनीला कंत्राट देऊन अशा संवेदनशील असणाऱ्या शहरांमध्ये शहरातील संवेदनशील परिसरामध्ये भागामध्ये प्रत्येक मुख्य चौकामध्ये हाय व्होल्टेज कॅमेरा सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत.
गुन्हेगारांनो सावधान समाजकंटकांनो सावधान शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केल्यास ” तिसऱ्या डोळ्याची नजर तुमच्यावर आहे ” गृहमंत्रालयाने अतिशय सर्वसामान्य नागरिकांकरिता व्यापाऱ्यांकरिता छोट्या-मोठ्या फेरीवाल्या करिता शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहून शहरात शांतता बंधू भाऊ कायम राहावा व सर्व समाजातील नागरिक गुण्यागोविंदाने आपला दैनंदिन व्यवहार करावा हा आहे. मात्र समाजामध्ये काही समाजकंटक, गुन्हेगार, काही राजकीय पक्षांचे हेवेदावे करणारे पदाधिकारी हे मात्र शहरातील शांतता बिघडण्याचा व कायदा व सुव्यवस्था धोक्यात (Pusad Crime) आणण्याचा प्रयत्न करीत असतात त्यांच्याकरिता हे विशेष.