– मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत वायकोस व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश झळके याकडे लक्ष देणार का!
पुसद (Pusad Municipal Council) : शहरातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असलेल्या व हार्ट ऑफ सिटी म्हणून गणल्या गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाशिम रस्त्यावरील धनसळ पांदण या शासनाच्या फुकटच्या जागेवर काही अतिक्रमणधारकांनी ताबा मिळून मोठ्या प्रमाणात पक्के दुकाने बांधण्याचा सपाटा लावला आहे. याप्रकरणी एका लोकल पत्रकाराने पुसद नगर परिषदेमध्ये तक्रार दाखल केली होती.
मात्र तो विकल्या गेला. त्याने तक्रार परत घेतली. तक्रार जरी परत घेतल्या गेली असली तरी अनधिकृत असलेल्या बांधकामावर प्रशासन कारवाई का करीत नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा अर्थ असा निघतो की, (Pusad Municipal Council) प्रशासनाला ही शासनाच्या जागांची महत्त्व कळत नाही, कोणी अतिक्रमणधारक शासनाची जागा ताब्यात मिळून व त्यावर पक्के दुकाने बांधून भाडे करि ठेवून त्यांच्याकडून लाखो रुपयाचे भाडे वसूल करीत असेल तर अशा देशद्रोह्यांना म्हणावे तरी काय हे विशेष, नगरपालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम प्रशासन यावर कारवाई करत नसेल तर जन नागरिक कठोर आंदोलन उभे करतील एवढे निश्चित.