Mahagaon :- तालुक्यातील बिजोरा येथे सुरू असलेल्या जुगार (Gambling) अड्ड्यावर महागांव पोलिसांनी कार्यवाही करून जुगार खेळणार्या ८ जुगारींना अटक करण्यात आले आहे. ही कार्यवाही १९ जुलै रोजी दुपारी ५ च्या सुमारास करण्यात आली असून २ लाख ८३ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२ लाख ८३ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त
बाळू दिगांबर रणमले (४०) रा.नेहरूनगर, प्रल्हाद देवबा ससाने (५५), सदानंद दामाजी वानोळे (४०), किरण प्रल्हाद ससाने (२७), सर्व रा. बिजोरा, प्रदीप लक्ष्मण पिंपळे (४१) रा. नेहरूनगर, साहेबराव हिरामण इनकर (४७) रा. बिजोरा, वाघोजी शंकर ठाकरे (३८) रा. बिजोरा, सुधाकर रत्नाकर जाधव (४०) रा. राजुरा अशी जुगारी आरोपीतांची नावे आहेत. महागाव तालुक्यातील बिजोरा येथे जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती महागांव पोलीस स्टेशनला मिळताच त्या आधारे महागांव पोलीस स्टेशन ने सापळा रचून ही कार्यवाही पार पडली.




