लातूर (Latur):- लातूर शहरापासून जवळच असलेल्या कातपूर येथील पंकज लॉजवर लातूर पोलिसांनी छापा टाकून ३ महिलांची सुटका केली व वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
वेश्या व्यवसाय चालविल्याने AHTU ची कारवाई
पंकज लॉजवर(lodge) वेश्या व्यवसाय (Prostitute business) चालविला जात असल्याची गुप्त माहिती अनैतिक मानवी व्यापार व वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) ला प्राप्त झाली होती. तेथील हॉटेल मालक व मॅनेजर काही महिलांना वेश्या गमनासाठी आणून एजंट करवी गिऱ्हाईक आणत वेश्या व्यवसाय चालवित आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने २ शासकीय पंचांना बोलून एक बनावट ग्राहक वेश्या गमनाच्या नावाखाली लॉजवर पाठविण्यात आला होता. बनावट ग्राहकाकडून इशारा मिळतात पथकाकडून पंकज लॉजवर छापा टाकण्यात आला. सदर छाप्यात बाहेर गावाहून आणलेल्या ३ महिला मिळून आल्या तर लॉज मालक, मॅनेजर, एजंट यांना लॉजवरून ताब्यात घेण्यात आले आहे.
वेश्या गमनासाठी आणलेल्या ३ महिलांची सुटका
याप्रकरणी वेश्या गमनासाठी आणलेल्या ३ महिलांची सुटका करण्यात आली. तर आरोपी विकास बापूसाहेब पडवळ (वय 47 वर्ष, रा कातपूर, ता.जि. लातूर), बालाजी नागोराव देवकते, (वय 30 वर्ष रा कातपूर, ता. जि. लातूर), अभिषेक सूर्यवंशी (रा. शिवनी, ता. जि. लातूर, हा फरार आहे), बाळासाहेब नागनाथ जाधव, (रा. कातपुर, ता.जि. लातूर) व अजय रत्नाकर कांबळे, (वय 25 वर्ष, रा सताळा, ता. उदगीर जि. लातूर) यांना अटक करण्यात आली. सदर प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन (Police sation)येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री माकोडे हे करीत आहेत.