तुमसर रोड रेल्वेस्थानकावरील घटना
भंडारा/माडगी (Railway Passenger Death) : रेल्वेस्थानकावरील खुर्चीवर बसलेल्या प्रवाश्याचा मृत्यू झाल्याची घटना दि.२ जून २०२५ रोजी सकाळी ९ वाजता दरम्यान (Railway Passenger Death) तुमसररोड रेल्वेस्थानकात घडली. गजानन रामकृष्ण समरीत (३५) रा. हुडकेश्वर, नागपूर असे मृत प्रवाश्याचे नाव आहे.
गजानन समरीत हा तिरोडा येथे नातेवाईकाकडे गेला होता. तो नागपूरला परत जाण्याकरीता दि.२ जून रोजी गोंदिया-महाराष्ट्र एक्सप्रेस या गाडीने तिरोडा येथून प्रवासाकरीता निघाला होता. प्रवासादरम्यान त्याला अस्वस्थ वाटल्याने तो गाडीतून उतरून (Railway Passenger Death) तुमसररोड रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्र.३ वरील खुर्चीवर जाऊन बसला. यावेळी त्याची प्रकृती आणखी बिघडल्याने तो खुर्चीवरच झोपून राहिला. गाडी सुटल्यानंतरही बराच वेळ झोपून दिसल्याने विचारपूस केल्यास मृतावस्थेत आढळून आला. याची माहिती जी.आर.पी.एफ.गोंदिया यांना देण्यात आली असून शवविच्छेदन करून नातेवाईकांना देण्यात आली.
