साधूविरुद्ध गुन्हा दाखल!
राजस्थान (Rape Case) : राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील एका साधूविरुद्ध एका तरुणीवर बलात्कार आणि अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याबद्दल गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, ही घटना गुरुवारी बलदेवगड परिसरातील पांडुपोल मेळ्यादरम्यान घडली, जेव्हा हनुमान मंदिरात आलेले 2 तरुण भंवरानंद महाराज नावाच्या साधूसोबत त्याच्या आश्रमात गेले.
अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करण्याचा केला प्रयत्न!
पीडितांनी नंतर आरोप केला की, साधूने 22 वर्षीय तरुणीसोबत लैंगिक संबंध (Sexual Relations) ठेवले आणि 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य (Obscene Act) करण्याचा प्रयत्न केला. पीडितांनी मेळ्यात तैनात असलेल्या पोलिसांशी संपर्क साधला. साधूविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.
पीडितांची वैद्यकीय तपासणी केली जाईल!
पोलिस अधीक्षक सुधीर चौधरी म्हणाले की, पीडितांनी पोलिसांना घटनेबद्दल सांगितल्यानंतर साधूला ताब्यात (Sadhu In Custody) घेण्यात आले. आरोपी साधूची चौकशी करण्यात आली. त्यांनी सांगितले की, कथित गुन्हा ताहला पोलिस स्टेशन (Tahla Police Station) परिसरात घडला असल्याने, गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास राजगडच्या सर्कल ऑफिसरकडे सोपवण्यात आला आहे. पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, पीडितांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. ते म्हणाले, ‘तपासानंतर सत्य बाहेर येईल.’
गावकऱ्यांनी साधूला केली मारहाण!
दरम्यान, सोशल मीडियावर असे व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यात गावकरी साधूला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन करताना दिसत आहेत. पोलिसांनी सांगितले की, साधू अजूनही ताब्यात आहे आणि तपास सुरू आहे.