लातूर (Rashtra Seva Dal) : साने गुरुजी यांच्या प्रेरणेने कार्यरत असणाऱ्या राष्ट्र सेवादलाच्या लातूर जिल्हा अध्यक्षपदी पांडुरंग देडे तर सचिवपदी हरिदास तमेवार यांची उदगीर येथे झालेल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली.
उदगीर येथील साने गुरूजी विद्यालयात बुधवारी (दि.19) राष्ट्र सेवादलाच्या (Rashtra Seva Dal) सर्व कार्यकर्त्यांची बैठक प्राचार्य डॉ. बाबूराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. निवडणूक राज्य निरीक्षक अॅड. प्रदीप पाटील लातूर यांच्या आदेशानुसार लातूर जिल्ह्यातील सेवादल कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ही कार्यकारणी सन 2025 ते 2028 पर्यत कार्यरत राहील. यावेळी राष्ट्र सेवादलाचे दिगंबरराव बुरसपटे गुरूजी, बापूसाहेब गजेवाड,अंकुश गायकवाड, प्रा. बबन पवार, मुंढे एस.एस., श्रीशैल्य बिरादार इत्यादी कार्यकर्ते हजर होते. यामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून अमर बागबंदे यांची निवड करण्यात आली.
या (Rashtra Seva Dal) निवडीबद्दल जिल्ह्यातील जेष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे, प्राचार्य सोमनाथ रोडे, प्राचार्य नागोराव कुंभार, प्रा. शिवाजी जवळगेकर, मु.अ. विजय चव्हाण, शेषेराव चव्हाण इत्यादी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.




