हिंगोली (Birth-Death Registration) : जन्म – मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ व सुधारणा अधिनियम २००३ अन्वये जन्म मृत्यू नोंदणी घेण्याबाबतचे प्रमाणपत्र निर्गमित केले होते. अकोला जिल्ह्यासह राज्यात ११ ऑगस्ट २०२३ पासुन स्थगिती आदेशापर्यंत निर्गमित झालेल्या (Birth-Death Registration) जन्म – मृत्यू प्रमाणपत्रा पैकी जे प्रमाणपत्र तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी या पदापेक्षा कमी दर्जाच्या अधिकार्यांनी निर्गमित केलेले आहेत ते प्रमाणपत्र रद्द करण्यात आले असुन त्याची सक्षम अधिकार्याकडून फेर तपासणी झाल्यानंतर यथा शिघ्र निर्णय घ्यावा असे निर्देश देण्यात आलेले आहेत.
त्यानुसार हिंगोली तालुक्यातील ११ ऑगस्ट २०२३ पासुन स्थगिती आदेशापर्यंत निर्गमित झालेल्या (Birth-Death Registration) जन्म – मृत्यू प्रमाणपत्रापैकी जे प्रमाणपत्र तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी या पदापेक्षा कमी दर्जाच्या अधिकार्यांनी निर्गमित केलेले आहेत ते सर्व प्रमाणपत्र त्याची फेर तपासणी करण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र जवळपास १०४६ आहेत. यासाठी काही कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे.
ज्यामध्ये विहीत नमुन्यातील अर्ज, शपथपत्र घोषणापत्र जवाब, वकीलपत्र, ओळखीचे पुरावे अर्जदाराचे आधार ओळखपत्र, पॅनकार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, पारपत्र, बँका पोस्ट पासबुक, जॉब कार्ड इत्यादी, शैक्षणीक पुरावे – शाळेचा प्रवेश निर्गम रजिस्टरचा उतारा, बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला ईत्यादी, जन्माचे अनुषंगाने पुरावे- रुग्णालयातील कागदपत्रे, रुग्णालयाती प्रमाणपत्र, लसीकरण, रहिवास अनुषंगाने पुरावे- मालमत्ता कराची पावती, पाणीपट्टी, विजबील पावती, मृतयुच्या अनुषंगाने पुरावे शव विच्छेदन अहवाल, प्रथम खबरी अहवाल, रुग्णालयातील कागदपत्रे.
मालमत्तेचे पुरावे सातबारा उतारा, नमुना ८ अ चा उत्तारा, वारस नोंदीचे फेरफार, मिळकत उत्तारा, खरेदी खत, नोंदणीकृत दस्त, कौंटुबीक पुरावे परिवारातील सदस्याचे जन्म प्रमाणपत्र, शिधापत्रिका विवाह प्रमाणपत्र, आई वडील रकताच्या नातेवाईकाचे अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जमीन उतारा, खरेदीखत, कर पावती आधार कार्ड, पॅनकार्ड तसेच अर्जदाराची वंशावळ आणि त्यांची ओळख पटविणारे शासकीय अभिलेखे तसेच शासकीय दस्ताऐवज ईत्यादी, जन्म घरी झाल्यास अंगणवाडी सेविका व तत्सम अन्य कर्मचारी यांचे जवाब, प्रतिज्ञापत्र मनपा, ग्रामपंचायत अनुपल्ब्धता प्रमाणपत्र, अर्जदाराच्या स्वयंघोषणापत्र, शपथपत्रावर दोन स्थानीक प्रतिष्ठीत नागरीक, पोलीस पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी, तंटामुक्ती अध्यक्ष, राजपत्रीत अधिकारी यांची साक्षीदार म्हणुन स्वाक्षरी घेण्यात यावी.
अर्जदाराच्या विलंबाच्या नोंदीबाबत निर्णय घेताना त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या कुटुंबाच्या रहीवासाची व कुटुंबातील सदस्यांच्या जन्माच्या पुराव्याची माहिती तसेच जन्म झाल्यापासुन ते विलंबाच्या जन्म नोंदीच्या अनुषंगाने विलंबाच्या अर्ज सादर करेपर्यतच्या कालावधीत कोठे वास्तव्य केले याबाबतचे पुरावे, स्थानोक रहीवासाच्या ठिकाणी तलाठी, ग्रामसेवक यांचे मार्फत स्थानीक चौकशी, पंचनामा करुन वस्तुस्थितीदर्शक अहवाल, अर्जदाराच्या स्थानीक जन्माच्या ठिकाणचा व रहीवासचा तपास करुन चौकशी अहवाल पोलीस विभागाकडुन मागविण्यात यावे. हे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहेत.
दररोज २० प्रमाणपत्र धारकांची होणार सुनावणी: श्रीकांत भुजबळ
हिंगोली तहसील कार्यालयाकडून ३१ मार्च २०२४ ते २० जानेवारी २०२५ या कालावधीत १०४६ इतके जन्म / मृत्यू प्रमाणपत्र (Birth-Death Registration) निर्गमित करण्यात आलेले आहेत. एकाच वेळी सर्वाची फेर तपासणी करणे शक्य नसल्याने दररोज २० प्रमाणपत्र धारकांची सुनावणी घेण्यात येईल, तसेच त्याबाबत सुनावणीच्या नोटीस व नेमुण दिलेल्या दिनांकास संबंधितांनी हिंगोली तहसील कार्यालयात स्थापन केलेल्या कक्षामध्ये उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी केले आहे.