डी बी पथकाची कारवाई
मानोरा (Manora theft case) : मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजे विठोली येथील चोरी प्रकरणातील आरोपी गणेश सुनील वाघ व अक्षय बाळू पिंगाणे यास गुप्त माहितीवरून डीबी पथकाने अटक करून (Manora theft case) चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी राहुल सुरेश ढोले याने १५ मे चे रात्री दरम्यान फिर्यादीचे जनावराचे गोठ्या लगतचे धान्य रुम मधील ५० – ५० किलो चे दोन गव्हाचे कट्टे किंमत २६०० रुपये व दोन ५० – ५० किलो चे हरभराचे कट्टे ५५०० रुपये किमतीचे असा एकुण ८१०० रुपयाचा माल अज्ञात चोरट्याने गोठ्याचे दरवाजाचा कुलुप कोंडा तोडून चोरून नेला असा रिपोर्ट दिल्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरूद्ध कलम ३३४ ( १ ), ३३१ ( ४ ), ३०५ ( अ ) बीएनएस २०१३ अन्वये गुन्हा नोंद केला. (Manora theft case) डि बी पथकाने त्वरित घटनास्थळाला भेट देऊन गुप्त माहीती वरून विठोली येथील आरोपी गणेश सुनिल वाघ व अक्षय बाळु पिंगाणे यांना रात्री अटक केली.
आरोपींनी लपवुन ठेवलेले दोन ५० – ५० किलोचे गव्हाचे व हरभराचे कट्टे एकूण किंमत ८१०० रुपयाचे दोन शासकिय पंचा समक्ष मेमोरंडम पंचनामा प्रमाणे विठोलीचे बाभुळवणातुन जप्त केले. दोन्ही आरोपीना विद्यमान कोर्टात पेश केले असता आरोपी गणेश वाघ जैल वाॅरंट तर आरोपी अक्षय पिंगाणेची बेल विद्यमान कोर्टाने मंजुर केली आहे. (Manora theft case) सदर गुन्हाचा तपास पोनि प्रविण शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि अभिजीत बारे, पोहवा मदन पुणेवार, पोशी मनिष अगलदरे, पोशी रोहण तायडे, पोशि फिरोज खान यांनी केला २४ तासाचे आत चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन मुद्देमाल जप्त केला आहे.