जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी तडकाफडकी काढले आदेश
हिंगोली (Hingoli Revenue Department) : अवैध गौणखनिज प्रकरण चांगलेच गाजत असताना या (Revenue Department) प्रकरणात छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ.ज्ञानेश्वर धायगुडे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात ससेवाडी सज्जाचे तलाठी एम.बी.गळाकाटू व मंडळ अधिकारी के. एन. पोटे यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढले आहे. हिंगोली शहरालगत गौणखनिज अवैध उत्खनन प्रकरणात निष्क्रिय तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदारांवर कार्यवाही करून शासनाचा लाखो रूपयांचा (Revenue Department) महसूल बुडाल्याने त्याची वसुली करण्यासंदर्भात डॉ. ज्ञानेश्वर धायगुडे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती.
त्यानुसार उपविभागीय अधिकार्यांनी केलेल्या चौकशी दरम्यान एटीएस मोजणीनुसार एकूण परिणाम ४९५९.९८ ब्रास आहे. तसेच हिंगोली शहरात ७०.५२ ब्रास, बळसोंड ६७.४८ ब्रास व कारवाडी येथे ५.८८ ब्रास वाळूसाठे आढळून आले आहेत. तसेच तहसीलदार (Hingoli Revenue) हिंगोली यांनी सादर केलेला खुलासा हा समाधानकारक वाटला नाही. एकूण केलेल्या चौकशी नुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ससेवाडी सज्जाचे तलाठी एम.बी. गळाकाटू व मंडळ अधिकारी के.एन. पोटे यांच्या निलंबनाचे आदेश १५ जुलैला तडकाफडकी काढल्याने एकच खळबळ उडाली आहे.