सर्व ग्राम महसूल सेवक यांनी त्यांच्या वेतनातून त्यांना केली आर्थिक मदत!
रिसोड (Revenue Week) : तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर (Tehsildar Pratiksha Tejankar) मॅडम रिसोड यांच्या मार्गदर्शनात आज महसूल सप्ताह (Revenue Week) निमित्त मौजे भोकर खेड येथे कवठा मंडळातील मंडळ अधिकारी आणि सर्व ग्राम महसूल अधिकारी, सरपंच, पोलिस पाटील आणि प्रतिष्ठित नागरीक यांनी श्री नामदेव शंकर रंजवे ह्या आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबास भेट दिली. मौजे भोकरखेड येथील ग्राम महसूल अधिकारी कोतिवार (Village Revenue Officer Kotiwar) मॅडम यांनी नामदेव रंजवे यांच्या पत्नी शशिकलाबाई यांनी संजय गांधी निराधार योजनेची फाइल भरून घेतली. तसेच मंडळातील मंडळ अधिकारी व ग्राम महसुल अधिकारी यांनी त्यांना मिळणाऱ्या विविध शासकीय योजना (Govt Scheme) मिळत आहेत की, नाही याची खात्री केली. आत्महत्याग्रस्त कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाकीची असल्याने मंडळ अधिकारी आणि सर्व ग्राम महसूल सेवक यांनी त्यांच्या वेतनातून त्यांना आर्थिक मदत केली. तसेच यापुढे कवठा मंडळामध्ये अशी काही दुर्दैवी घटना घडली असल्यास सर्वांच्या वेतनातुन त्या कुटुंबास आर्थिक मदत (Financial Aid) देण्याचे ठरविले आहे. सदर भेटीचे प्रसंगीमंडळ अधिकारी श्री गरकळ साहेब, ग्रामहसुल अधिकारी श्री सडके, श्री गिरी, श्री रुपेश मुलगे, श्री स्वप्नील धांडे, श्रीमती भावना पुरोहित आणि श्रीमती कोतिवार मॅडम गावातील सरपंच पाटील, पोलीस पाटील आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.