अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांची उपस्थिती
परभणी (Sonpeth Tehsil office) : सोनपेठ येथील तहसील कार्यालयात शालेय विद्यार्थीना विविध प्रमाणपत्रांचे वाटप,संगायो मंजूरी आदेश व आढावा बैठक अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांच्या उपस्थितीत आज दि १२ जून रोजी संपन्न झाली आहे. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून संबंधितांना वरिष्ठांनी सुचना देण्यात आल्या आहेत.
शालेय विद्यार्थीना विविध प्रमाणपत्रांचे वाटप
सोनपेठ तहसील कार्यालयात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे हे होते तर, व्यासपीठावर तहसीलदार सुनील कावरखे,नायब तहसीलदार देवेंद्रसिंह चंदेल, मंडळधिकारी शिवाजी कराड, मंडळधिकारी पंडीत सुरवसे, मंडळधिकारी ज्योती प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते.
संगायो लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वाटप
यावेळी सोनपेठ शहरासह ग्रामीण भागात शालेय विद्यार्थीना उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र यांच्या सह विविध प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली आहे.तसेच संगायो योजनेअंतर्गत असलेल्या पात्र लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वाटप करण्यात आले आहे. हे कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर लागलीच मंडळधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली आहे. यामध्ये (Sonpeth Tehsil office) सोनपेठ तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी ॲग्रीस्टॅक महत्वाचे आहे. त्याअनुषंगाने सोनपेठ तालुक्यात प्रलंबित राहिलेल्या शेतकऱ्यांचे अँग्रीस्टॅक नावनोंदणी लवकर पूर्ण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर सद्या पावसामुळे सुरू झाला असल्याने पावसाळ्यात गोदावरी नदी व वान नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली तर महसूल विभागासह सर्व यंत्रणा सज्ज राहण्याच्या बाबतीत संबंधितांना सुचना दिल्या आहेत. (Sonpeth Tehsil office) नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन संदर्भात सर्वांनी सज्ज राहावे असे आवाहन केले आहे. या बैठकीला अमोल गर्जे, अतुल निरडे, सुग्रीव प्रधाने, अमोल स्वामी, बालाजी नागदे,शाहुराज दिक्षित, यांच्यासह सहाय्यक महसूल अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक आदी उपस्थित होते.