रिसोड (Risod Bazar Samiti) : रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती इंदुबाई तेजराव वानखेडे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे उपसभापती पदावर कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आज 30 सप्टेंबर रोजी सकाळी 12 वाजता आयोजित विशेष सभेत शिवसेना शिंदे च्या आ.भावनाताई गवळी गटाचे ऍड गजानन परसराम अवताडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची अविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक अधिकारी जी. आर. फाटे यांनी जबाबदारी पार पाडली. यावेळी सभापती विष्णुपंत भुतेकर, (Risod Bazar Samiti) बाजार समितीचे सचिव विजयराव देशमुख तसेच अनेक संचालक उपस्थित होते. बाजार समितीच्या संचालक मधून धनंजय बोरकर व माजी उपसभापती इंदुबाई वानखेडे अनुपस्थित होते.
गजानन अवताडे यांच्या निवडीनंतर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या तथा विधान परिषद आमदार भावनाताई गवळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात तसेच बाजार समितीच्या प्रांगणात समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलाब उधळून जल्लोष साजरा केला. यानंतर उपसभापती गजानन अवताडे यांनी भावनाताई गवळी व भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार अनंतराव देशमुख माजी आमदार विजयराव जाधव यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले व आगामी कार्याबाबत सकारात्मक चर्चा केली.
यावेळी वरिष्ठ नेत्यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. (Risod Bazar Samiti) रिसोड बाजार समितीच्या उपसभापती ॲड अवताडे यांची बिनविरोध झालेल्या निवडीमध्ये माजी सभापती तथा विद्यमान संचालक गजानन पाचारणे यांनी महत्त्वाची भूमिका बजाल्याची चर्चा बाजार समितीच्या वर्तुळात होती