रामेश्वर चव्हाण ठाणेदार रिसोड
रिसोड (Risod Municipalty Council) : शहरातील आस्तावेस्त वाहतुकी शिस्त लावण्या संदर्भात ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्था नेतृत्वात पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला असून, आज ता.21 मार्च रोजी स्थानिक पोलिस स्टेशन मध्ये विविध प्रकारच्या फेरीवाल्यांची सभा घेऊन नियमाचे पालन करण्या संदर्भात कडक सुचना ठाणेदार चव्हाण यांनी दिल्या आहेत.
नगर परिषद बांधकाम विभागाच्या पुढाकाराची गरज
शहरातील विविध मार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. (Risod Municipalty Council) रिसोड शहरातील वाहतुकीचा प्रश्न चर्चेचा विषय बनला असुन रिसोड शहरातील महत्त्वाच्या मार्गासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भाजी बाजार,वाशिम नाका ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, वाशिम नाका ते मालेगाव नाका व शहरातील अंतर्गत भागात रस्त्याच्या मधोमध दुचाकी मोटरसायकलसह चारचाकी वाहनधारक तसेच रस्त्याच्या मधोमध दुकाने लावुन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थी तसेच वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्याच अनुषंगाने रिसोडचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण व (Risod Municipalty Council) रिसोड नगर परिषदेचे मुख्य प्रशासक सतीश शेवदा यांच्या नेतृत्वात आज 21 मार्च रोजी रिसोड पोलीस स्टेशन मध्ये रिसोड शहरातील भाजीपाला विक्रेते यांची एक संयुक्तिक बैठक घेऊन त्यांना बैठकीमध्ये वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही.
आपले दुकाने कोठेही नियमबाह्य न लावता नियोजनबद्ध पद्धतीने आपल्या दुकानाची मांडणी करून शालेय विद्यार्थ्यासह सर्वसामान्य नागरिक तसेच वाहनधारकांना आपल्या पासुन त्रास होणार नाही,याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. कायदा हा सर्वांसाठी सकारात्मक असुन कायद्याचा आदर करणे हे सर्वसामान्य नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे आपल्या कडुन कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यायलाच पाहिजेत असे आव्हान रिसोडचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी यावेळी केले.
रिसोड शहरातील आंबेडकर चौक ते लोणी फाटा या मार्गावर अनेक शैक्षणिक संस्था असुन या मार्गावर नेहमीच वर्दळ असते.परंतु रस्त्याच्या मधोमध दुकाने लावुन तसेच दुकानासमोर दुचाकी मोटरसायकल उभी करून या मार्गावरून ये जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक तसेच वाहन धारकांना त्रास होत आहे.रस्त्याच्या मधोमध बसलेल्या दुकानदारांसाठी (Risod Municipalty Council) रिसोड नगर परिषदेच्या वतीने योग्य जागेचे नियोजन करून त्यांना त्या ठिकाणी स्थायिक करण्यात येईल असे यावेळी रिसोड नगर परिषदेचे मुख्य प्रशासक सतीश शेवदा यांचे प्रतिनिधी प्रतापराव देशमुख यांनी सांगितले.
जोपर्यंत आपल्या जागेचे नियोजन लागत नाही तोपर्यंत रस्त्याच्या मधोमध दुकाने लावुन वाहतुकीस अडथळा निर्माण केलेल्या दुकानदारांनी आपल्या दुकानाची जागा लहान करून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आव्हान रिसोडचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी केले. यावेळी रिसोड शहरातील सर्व भाजीपाला विक्रेते तसेच फळ फ्रृट विक्रेते व शहरातील महत्त्वाच्या मार्गावर तसेच अंतर्गत भागात हातगाडी द्वारे भाजीपाला विक्री करणारे विक्रेते बहुसंख्येने उपस्थित होते.
नगरपरिषद बांधकाम विभागाच्या पुढाकाराची गरज
शहरातील कुढल्याही बांधकाम कामा आधी नगरपरिषद बांधकामाची परवानगी त्या प्रमाणे लेआऊट टाकुण कामाला प्रारंभ होईपर्यंत (Risod Municipalty Council) नगरपरीषद बांधकाम विभाग अभियंताची एक तरी भेट असणे आवश्यक असते. शहरातील अनेक व्यवसायीक व्यापारी गाळे धिरकांनी नियम धाब्यावर बसविल्याने अनेक व्यापारी संकुलानी आपली पार्किंग जागा बांधकामात सामावुन घेतल्याने ग्राहकांची वाहणे रस्त्यावर ठेवली जातात. पर्यायाने रहदारीस आडथळा निर्माण झाला आहे. फेरीवाल्यांना नियोजित जागा देणे हे सुद्धा बांधकाम विभागाचे काम आहे