रिसोड (Risod) :- तालूक्यातिल वाकद येथील शेतकरी शेतमजुराचा सर्पदंश (snakebite)आणि मृत्यू (Death) झाल्याकारणाने त्यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मदत देण्यात यावी अशी मागणी भाजपा उत्तर भारतीय प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य लखनसिंह ठाकुर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत भरीव निधी देण्यात अशी मागणी
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की रिसोड तालुक्यातील मौजे वाकद येथील अत्यंत गरीब कुटुंबातील शेतमजूर स्वर्गीय फकीरा सखाराम तिरके वय 55 हे शेतामध्ये राबत असताना दिनांक 10 मे रोजी संध्या. 5 च्या दरम्यान सर्पदंशाने त्यांना चावा घेतला. त्यामुळे त्यांचा शेतामध्ये जागी दुर्दैवी मृत्यू झाला. फकीरा सखाराम तीरके यांची घरची व कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. त्यांच्या पश्चात त्यांना 3 अपत्य आहेत. कुटुंबामध्ये ते स्वतःच कुटुंबाचा संपूर्ण भार सांभाळत होते. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्याकारणाने त्यांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत भरीव निधी देण्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.