रिसोड (Risod):- जिल्ह्यातील भर जहागीर येथिल श्रीपंचायती आखाडा महानिर्वाणीचे मठाधिपती महंत रमेशगिरीजी महाराज, महंत जमनापुरीजी, महंत रविंद्र पुरीजी यांची उत्तर प्रदेश येथिल 13 जानेवारी 2025 ला प्रारंभ होत आसलेल्या “कुंभ मेळाव्या तील सुविधा संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सखोल चर्चा झाली.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पंतप्रधान मोदी यांच्याशी महंतांची झाली चर्चा
भर जहागीर येथिल महंत रमेशगिरीजी महाराज हे महिनिर्वाणी श्रीपंचायती आखाड्याचे मुख्य सचिव आसुन प्रयागराज (Prayagraj)येथे प्रारंभ होत आसलेल्या “कुभ मेळाव्याचे सुध्दा सचिव आहेत. भर जहागीर येथिल श्रीपंचायती आखाडा महानिर्वाण शाखा ही मुख्य शाखा आसुन देशातील या आखाड्याचे सचिव हे भर जहागीर येथिल महंत रमेशगिरीजी महाराज आहेत. कुंभमेळावे हे चार प्रकारचे होत आसतात. कुंभ अर्ध कुंभ, महाकुंभ आणि पुर्व कुंभ आशा प्रकारचे चार कुंभ मेळावे संपन्न होत आसतात.विशेष म्हणजे ज्या ठिकाणी गंगा,जमुना,सरस्वती नद्यांचे संगमावर उदा.हरिद्वार, नाशिक, उज्जैन आणि प्रयागराज या ठिकाणी कुंभ मेळा हा दर 12 वर्षानी साजरा करण्यात येतो. प्रयागराज येथिल कुंभ मेळाव्याचे सचिव म्हणुन भर जहागीर येथिल महंत रमेशगिरीजी महाराज, महंत जमनापुरीजी महाराज यांची कुंभ मेळाव्याचे मुख्य सचिव म्हणुन निवड झाल्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्याशी प्रयागराज येथिल 13 जानेवारी 2025 पासुन प्रारंभ होत आसलेल्या मेळाव्या संदर्भात सुविधा संदर्भात सखोल चर्चा झाली आहे. या मेळाव्या मध्ये लाखोभक्त सहभागी होणार आसल्याने येणा-या भक्तगणासाठी सर्व सुख सुविधा पुरविण्या संदर्भात चर्चा संपन्न झाली. प्रयागराज येथिल मेळाव्याचे सचिव पद जिल्ह्यातील भर जहागीर येथिल महंत रमेशगिरीजी महाराज यांची निवड झाल्याने भर जहागीर येथे आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करतांनी महंत रमेशगिरीजी,महाराज, महंत जमनापुरीजी महाराज,महंत रविंद्र पुरीजी महाराज,यांची उपस्थिती होती.