रिसोड (Risod) :- एका रात्रीत हलाखीच्या आयुष्याला कलाटणी देणारे किस्से अनेक घडत आहे,कारण अनेक वर्षाच्या कष्टाची बरोबरी आजच्या संगणकीय युवात एका झटक्यात सहज होऊ शकते,याचे ताजे उदाहरण म्हणजे वाशीम जिल्ह्य़ातील रिसोड तालुक्यातील मोप येथिल सुवर्णकार समाजातील ॠषीकेश सौ.रेखा विष्णुपंत साखरकर यांच्या हरहुन्नरी मुलगा ता.13 एप्रिल रोजी “ड्रिम ऐलव्हण” (Dream 11) या मोबाईल वरील खेळा मध्ये सुमारे तीन कोटी रूपयांच्या बक्षीसाचा मानकर ठरला आणि अवघ्या काही तासात ऋषिकेश अनेकांच्या कौतुकास पात्र ठरला.
हलाखीच्या कुटुंबातील युवकाचे एका रात्री आयुष्य बदलले,सर्वत्र आनंदोत्सवाचे वातावरण
रिसोड तालुक्यातील मोप येथिल सुवर्णकार समाजातील ऋषिकेश रेखा विष्णुपंत साखरकर हा गरीब कुटुंबातील मुलगा आपल्या गरीब परीस्थित सुध्दा वडील काकांच्या सहकार्याने बि.सी.ए.पर्यंत शिकला,पुढे शासकीय नोकरीचा कुठेच थांगपत्ता लागत नसल्याने आपल्या काकांच्या ज्वलर्स मध्ये काम करीत होता. परंतु ऋषिकेश मधील टॅलेंट त्याला सतत काही तरी करणे भाग पाडत होते. आशातच मागील काही दिवसांपासून आयपीएल हा टी-20 क्रिकेटचा महासंग्राम सुरू झाला,आणि टिव्हीवर सहज क्रिकेट चा सामना पाहात ‘ड्रिम ऐलव्हन सारख्या अनेक भरघोष बक्षीसाचे खेळ सुरू झाले. यात ॠषीकेश ने आपले कौशल्य पनाला लावले आणि ता.13 एप्रिल रोजी त्याचे भाग्य फळफळले, कारण त्याने टि-20 च्या आर,आर,आणि आरसीबी संघाच्या सामन्या मध्ये ड्रिम ऐलव्हण चा 49 रूपयांची गुंतवणुक केली आणि 1.054.5 गुण मिळवित सुमारे तीन कोटी रूपयांच्या बक्षीस (reward) रक्कमेचे प्रथम क्रमांक मिळविला, हा नक्कीच सर्वांना आश्चर्याचा धक्का म्हणावा लागेल.
युवक ड्रिम ऐलव्हण मध्ये आपले भाग्य दररोजच आजमावतात
जगभरात कोट्या वधी व्यक्ती, युवक ड्रिम ऐलव्हण मध्ये आपले भाग्य दररोजच आजमावतात. परंतु रिसोड तालुक्यातील मोप या खेडेगावातील अगदी हालाखीच्या कुटुंबातील ॠषीकेश सुमारे तीन कोटी रूपयांच्या बक्षीसाचा मानकरी ठरला आणि अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले,अवघ्या काही तासामध्ये ॠषीकेश वर विजेते पदाच्या शुभेच्छांचा वर्षावर होण्यास प्रारंभ झाला, हा ड्रिम ऐलव्हण क्रिडाखेळ हा शासणमान्य आसल्याने दररोज कोट्यावधी युवक या खेळा मध्ये आपले भाग्य आजमावतात.परंतु प्रत्येकालाच यश मिळेल याची शाशवती नसली तरी मोप येथिल तीन कोटीचा रूपयांच्या बक्षीसाचा विजेता ठरलेल्या ऋषिकेश साखरकर मुळे ड्रिम ऐलव्हण खेळना-या युवकांच्या आशा पल्लवित झाल्याचे दिसुन येते.