परभणी/पालम (Parbhani):- शहरातील एका अल्पवयीन मुलीचा घरात कुणी नसल्याची संधी साधून विनयभंग (molestation) केल्याचा प्रकार बुधवार २५ डिसेंबर रोजी घडला. या प्रकरणी आरोपी डिगांबर भगवान बनसोडे रा. सरफराजपूर याच्या विरुध्द पोस्को (Posco)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीविरुध्द पालम पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी डिगांबर बनसोडे हा मागील काही दिवसापासून पिडीत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होता. बुधवार २५ डिसेंबर रोजी घरात कुणी नसल्याची संधी साधून आरोपी डिगांबर बनसोडे याने घरात घुसून पिडीत मुलीचा वाईट हेतून हात पकडला. सोबत फोटो काढून व्हायरल (Viral)करण्याची धमकी दिली. सदर प्रकार पिडीत मुलीने आई वडिलांना सांगितला. यानंतर कुटूंबियाने पालम पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन आरोपी डिगांबर बनसोडे याच्या विरुध्द पालम पोलिस ठाण्यात(Police Staion) विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोनि.थोरात यांच्या आदेशावरुन अधिक तपास सपोनि. राजेंद्र मुंढे हे करीत आहेत.