Pandharkawda :- येथील उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणुन परिविक्षाधीन भापोसे अधिकारी रॉबिन बन्सल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने (Home Department) ९ जुलै रोजी काढलेल्या एका आदेशाने त्यांची येथे बदली करण्यात आली आहे.
९ जुलै रोजी काढलेल्या एका आदेशाने त्यांची येथे बदली करण्यात आली
पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणुन रामेश्वर वैंजने कार्यरत आहे. आज ९ जुलै रोजी राज्याच्या गृह विभागाने जिल्हा प्रात्यक्षीक प्रशिक्षण व सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैद्राबाद (Hyderabad) येथील प्रशिक्षण पुर्ण करुन महाराष्ट्र संवर्गात रुजु होणार्या दहा परिविक्षाधीन भापोसे अधिकार्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहे. त्यामध्ये पाढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणुन रॉबिन बन्सल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आजच्या आदेशात बन्सल यांची येथे नियुक्ती करण्यात आली असली तरी विद्यमान उपविभागीय अधिकारी वैंजने यांच्या बदली बाबत कोणताही आदेश आलेला नाही.