ग्रामविकास मंत्री न्यायालयाचा दिलासा!
मानोरा (Rohna Gram Panchayat) : मानोरा पंचायत समिती (Manora Panchayat Samiti) अंतर्गत येणाऱ्या मौजे रोहना ग्राम पंचायतच्या (Rohna Gram Panchayat) लोकनियुक्त सरपंच्या श्रीमती प्रभावती सतीशराव देशमुख यांचे अपील अर्जावर ग्राम विकास मंत्री मंत्रालय (Ministry of Rural Development Minister) मुंबई यांनी अप्पर आयुक्त अमरावती यांनी दिलेल्या आदेशाला फेटाळून त्यांच्या बाजूने आदेश पारीत करत निर्णय दिल्याने पुन्हा सरपंच पदावर कायम राहणार आहेत.
सरपंच श्रीमती प्रभावती देशमुख यांना अपात्र घोषित!
अप्पर आयुक्त अमरावती (Upper Commissioner Amravati) यांनी त्यांच्याकडे दाखल प्रकरणावरून दि. 15 जानेवारी रोजी सरपंच श्रीमती प्रभावती देशमुख यांना अपात्र घोषित केले होते. त्यांनी दिलेल्या आदेशाला ग्राम विकास मंत्री यांचेकडे अपील अर्ज दाखल केले होते. सदर अपिलावर ग्रामविकास मंत्री (Rural Development Minister) मंत्रालय मुंबई यांनी ग्राम पंचायत अधिनियमाचे कलम 39 (3) नुसार अपील मान्य करून आदेश पारीत केला आहे. त्यामुळे श्रीमती देशमुख हया 5 वर्ष सरपंच पदावर कायम राहणार असून त्यांनी आमदार सईताई डहाके व मुख्यमंत्री यांचे ओसडी अमोल पाटणकर यांचे आभार मानले आहे.