कळमनुरी आढावा बैठक
कळमनुरी/हिंगोली (MP Nagesh Ashtikar) : अतिवृष्टीत खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून घरांची पडझडही झालेली आहे. या अतिवृष्टीचा आढावा खासदार नागेश पाटील आष्टीकर (MP Nagesh Ashtikar) यांनी घेतला. यावेळी अनेकांनी ग्रामीण पाणी पुरवठा (Water Supply) अधिकाऱ्याची बोगस कामाची तक्रार केल्यानंतर खासदार आष्टीकर हे चांगले संतातले संतप झाले व संबंधित अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात 12 सप्टेंबर रोजी खासदार नागेश पाटील आष्टीकर (MP Nagesh Ashtikar) यांनी तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक घेऊन अतिवृष्टीचा आढावा घेतला ग्रामीण पाणी पुरवठा मार्फत होत असलेले कामात मोठे प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार काय नागरिकांनी आढावा बैठक केली असता याबद्दल खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ग्रामीण पाणीपुरवठा अधिकाऱ्याला चांगला समाचार घेतला.
या बैठकीत उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, माजी आमदार डॉक्टर संतोष टार्फे, आदिवासी प्रकल्प अधिकारी सुनील बार्शी, गटविकास अधिकारी जीपी बोथीकर , तालुका कृषी अधिकारी नितीन घुगे,नायब तहसीलदार बालाप्रसाद धूत, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विठ्ठल करपे गोपू पाटील, जिल्हा संघटक , बाळासाहेब मगर ,सखाराम उबाळे, अजित मगर अब्दुल्ला पठाण ,शिवा शिंदे, डॉक्टर सतीश पाचपुते, आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना खासदार म्हणाले की, अतिवृष्टीत नुकसान झालेल्या खरीप पिकांचे पंचनामे तातडीनेकरा. कोणालाही लाभापासून वंचित ठेवू नका. कयाधू नदीच्या काठावरील पिके खरडून गेलेली आहेत.
तसेच गोठ्यांचेही नुकसान झाले. जनावरही दगावली आहेत या सर्वांचा पंचनामा करा. एकही शेतकरी लाभापासून वंचित ठेवू नका अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी खासदारांनी तहसील कार्यालय, महावितरण, पंचायत समिती, कृषी कार्यालयसह सर्वच कार्यालयाचा आढावा घेतला.नागरिकांच्या तक्रारीही ऐकून घेतल्या. अतिवृष्टीमुळे अनेक गावातील विजेचे खांब व तारा तुटल्या आहेत. त्यामुळे कवडी,देवजना आदी गावातील शेताचे विद्युत पंप बंद आहे. अनेक गावांमध्ये विजेची सेवा विस्कळीत झालेली आहे. या समस्येचे तत्काळ निराकरण करा अशा सूचनाही त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या अतिवृष्टीमध्ये तालुक्यातील 148 गावे बाधित झालेली आहेत.
अतिवृष्टीने बाधित 53 हजार 87 हेक्टरवरील पिकांचा सर्वे झालेला असून येत्या दोन ते तीन दिवसात सर्वच सर्वे पूर्ण करण्यात येईल तसेच घरांच्या पडझडीचा व गोठ्यांचा सर्वे झालेला आहे त्याचा अहवाल ही जिल्हाधिकाऱ्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी यावेळी दिली. यावेळी (MP Nagesh Ashtikar) खासदारांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या व या तक्रारीचे निराकरण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.




