यवतमाळ तहसीलदारांची कारवाई
यवतमाळ (Illegal sand smuggling) : शहरात चोरट्या पद्धतीने रेती तस्करी करतांना शहरातील दरव्हा रोडवरील लाठीवाला पेट्रोल पंपाजवळ उभे असलेले वाहन क्रमांक एम एच २९ टी ४२९९ हे सगीर मिस्त्री याच्या मालकीचे असलेल्या वाहनातून १ ब्रास (Illegal sand smuggling) अवैध रेती चोरून विकण्यासाठी आणली असता तसीलदार डॉ योगेश देशमुख यांना या संदर्भात माहिती मिळाली असता तलाठी मनिष भोंगे, पुरूषोत्तम चव्हाण, अनिल गावंडे, यांना या प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदार यांनी दिले असता तिन्ही पटवारी यांनी नेताजी नगर गाठून सदर ट्रकची पाहाणी केली.
ट्रक चालक विजय रमेश फुफरे रा. मुरझडी (रातचांदणा) याला ट्रकमध्ये असलेल्या रेती प्रकरणी विचारपूस केली असता सदर वाळू ही चोरून सगीर मिस्त्री यांच्या सांगण्यावरून आणली असून सगीर मिस्त्री कडे रोजाने काम करीत असल्याचे तसेच ही वाळू चोरून विक्री करण्यासाठी सगीर मिस्त्रीच्या सांगण्यावरून आणली असून सगीर मिस्त्री सांगेल त्या ठिकाणी (Illegal sand smuggling) वाळू पोहचवण्याचे काम करत असलेल्याचे वाहनचालकाने तलाठ्यांना सांगितले.
तलाठ्यांनी रेती तस्करी साठी वापरले वाहन व रेती असा एकुण ५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या (Illegal sand smuggling) प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात यवतमाळ तहसील कार्यालयामार्फत तक्रार दाखल करण्यात आली होती दिलेल्या तक्रारीवरून वाहनचालक विजय रमेश फुफरे व वाहनं मालक सगीर जाबीर अन्सारी मिस्त्री यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.