साईबाबा आश्रम शाळेत तीन दिवसिय श्री साई बाबा मुर्ती स्थापन उत्सव
कन्हान (Saibaba Temple) : साईबाबा आश्रमशाळा टेकाडी (को.ख.) येथे पटांगणात नव्याने बांधण्यात आलेल्या श्री साई मंदीरात (Saibaba Temple) श्री साईबाबा यांच्या मुर्तीची विधीवत स्थापना करून तीन दिवसीय उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
शनिवार (दि.११) ऑक्टोंबर सायंकाळी ४ वाजता साईबाबा आश्रमशाळा टेकाडी (को.ख.) ता. पारशिवनी जि. नागपुर येथिल पटांगणात नव्याने बांधण्यात आलेल्या श्री साई मंदीरातुन संकल्प रथ यात्रा व (Saibaba Temple) साई बाबा यांच्या पालखीचे भजन मंडळी सह मिरवणुकीने भ्रमण करण्यात येईल. रविवार (दि.१२) ऑक्टोंबर ला सकाळी ८ वाजता श्री साईबाबा मुर्तीचे विधीवत पुजन करून दिवस भर भजन, पुजा अर्चना करून सांयकाळी ४.३० वाजता मंदीरात श्री साईबाबा ची मुर्ती स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा करून सायंकाळी ५ वाजता आरती करून प्रसाद वितरण करण्यात येईल.
सोमवार (दि.१३) ला सकाळी आरती , भजन, किर्तन करून दुपारी गोपाल काला करून २ ते ६ वाजे पर्यंत महाप्रसाद वितरण करण्यात येईल.श्री साईबाबा मुर्ती स्थापना उत्सव कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आयोजक (Saibaba Temple) साईबाबा आश्रम शाळेचे संचालक मा. किशोर भाऊ रा. वानखेडे, समस्त वानखेडे परिवार व आश्रम शाळेचे शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद परिश्रम करित आहे.