औंढा नागनाथ महसूल पथकाची वाळू तस्करीवर दबंग कारवाई!
औंढा नागनाथ (Sand Smuggling) : औंढा नागनाथ तहसील कार्यालयाच्या महसूल पथकाने 1 जुलै मंगळवार रोजी पहाटे 5 वाजे दरम्यान दबंग कारवाई (Action) करत तालुक्यातील धार शिवारात पूर्णा नदी (Purna River) पात्रात अवैध वाळू उपसा करणारे चार किनी यंत्र ट्रॅक्टर हेड सहित तसेच अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर वाहन पकडले. यादरम्यान वाळू वाहतूक करणारा एक हायवा टिप्परही महसूल पथकाने (Revenue Squad) पकडला असून, सदरील वाहने सकाळी 11 वाजे दरम्यान, तहसील कार्यालयाच्या (Tehsil Office) आवारात आणून लावण्यात आली आहे.
कारवाईंने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणाणले!
हि कारवाई उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार हरीश गाडे, तलाठी विठ्ठल शेळके, मल्लिकार्जुन कापसे, केशव जगताप,नितीन अंभोरे, गोपाल मुकीर, बद्रीनाथ साबळे , निलेश ठाकरे यांच्या पथकाने केली आहे दरम्यान एवढ्या मोठ्या कारवाईंने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.