तहसीलदार हरिष गाडे यांच्या पथकाची कामगिरी!
औंढा नागनाथ (Sand Smuggling) : तालुक्यातील साळणा ते अनखळी रस्त्या दरम्यान तहसीलदार हरीश गाडे यांच्या पथकाने दिनांक 13 जून शुक्रवार रोजी रात्री सव्वा अकरा वाजे दरम्यान, अवैध वाळू वाहतूक करणारे टिपर क्रमांक एम एच 04 डीडी 0998, दुसरे एमएच 3R8 4793 असे दोन टिप्पर वाहन (Tipper Vehicle) पकडून जप्त (Confiscation) करत त्यातील वाळू सह टिप्पर वाहन तहसील कार्यालयाच्या (Tehsil Office) आवारात आणून लावण्यात आले आहेत. कारवाई जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (District Collector Rahul Gupta) उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार हरीश गाडे, मंडळ अधिकारी रंगनाथ मेहत्रे, मंडळ अधिकारी सुरेश बोबडे, तलाठी गोपाल मुकीर, बद्रीनाथ साबळे, विनोद ठाकरे, अंभोरे, मुंडे, कोतवाल गणेश जायभाय, केशव फलटणकर, पप्पू मोरे, साळवे, राखुंडे, तसेच पोलीस प्रशासनाकडून (Police Administration) जमादार संदीप टाक सह इतर कर्मचारी यांच्या पथकाने कारवाई केली.