पुलगाव येथील सहायक पोलिस अधीक्षकांच्या पथकाची कारवाई
वर्धा (Sand Stealing transport) : वारा पोटी घाटातून वाळूची चोरटी वाहतूक करणार्यांवर पोलिसांनी कारवाई केली. सहा जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पुलगाव येथील सहायक पोलिस अधीक्षकांच्या पथकाने केली.
पोलिसांनी गुप्त बातमीदारकडुन मिळालेल्या माहितीवरून छापा टाकला असता, आरोपी संगनमताने ट्रॅक्टर ट्रॉलीने अवैधरित्या वाळू (Sand Stealing transport) चोरून वाहतूक करताना मिळून आले. वर्धा नदीच्या पात्रातील वारापोटी घाटात ३ ट्रॅक्टर वाहतूक करताना मिळून आल्याने ट्रॅक्टर चालक व मालकाविरूध्द कायदेशीर कार्यवाही करून दोन पंचासमक्ष घटनास्थळ जप्ती पंचनामा कार्यवाही करत २२ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी तुषार खुनकर, रा. सोनेगाव (खुनकर), ता. हिंगणघाट, किरण हिरामन आडे, रा. सोनेगाव (खुनकर), ता. हिंगणघाट जि. वर्धा, त्र्यंबक ससाने, रा. मोझरी, ता. हिंगणघाट जि. वर्धा, शांकर येरमे, रा. मोझरी, ता. हिंगणघाट, बंडू गजानन उमाटे, रा. वरूड, ता. हिंगणघाट, सौरभ वाल्मीकराव उईके, रा. वरूड, ता. हिंगणघाट जि. वर्धा या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही (Sand Stealing transport) कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सागरकुमार कवडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस अधीक्षक राहुल चव्हाण यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक सुधीर बनकर, संदीप बोरबन, रामदास दराडे यांनी केली.