राकॉ पदाधिकार्यांनी वेधले आ. डॉ. नरोटे यांचे लक्ष
गडचिरोली (Gadchiroli Gharkul ) : गडचिरोली तालुक्यात मोठया प्रमाणात घरकुल मंजुर झाले आहेत. मात्र शासनाने पाच ब्रॉस रेती मोफत उपलब्ध करून देण्याच्या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी न केल्याने (Gadchiroli Gharkul) घरकुलांचे बांधकाम थंडबस्त्यात पडले आहे. या संदर्भात राकॉच्या पदाधिकार्यांनी आ. डॉ. मिलींद नरोटे यांना निवेदन सादर करून घरकुल बांधकामाकरीता रेती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
गडचिरोली तालुक्यामध्ये तब्बल ३९८२ घरकुल मंजुर झाले . यामध्ये रमाई ८४, मोदी आवास योजना १६८, प्रधानमंत्री आवास योजना ३६३१ तसेच शबरी आवास योजने अंतर्गत ९९ घरकुल मंजूर आहेत. शासनाने लाभार्थ्यांना विहीत कालावधीत (Gadchiroli Gharkul) घरकुलांचे बांधकाम करण्याचे निर्देश दिले आहेत. या अंतर्गल लाभार्थ्यांनी आपले राहते घर पाडून खड्डे खोदले आहेत. मात्र रेतीच मिळत नसल्याने घरकुलांचे बांधकाम ठप्प पडले आहे. या बाबीची दखल घेऊन घरकुलासाठी रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पदाधिकार्यांनी केली.
यावेळी निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विवेक बाबनवाडे, संजय शिंगाडे,गणेश बावणे,राविका जिल्हाध्यक्ष चेतन पेंदाम, रायुकॉ तालुकाध्यक्ष कुणाल चिलगेलवार, अंकीत तलांडे आदी उपस्थित होते.