हिंगोली (District Sales Exhibition) : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हिंगोली मार्फत कयाधू जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजक करण्यात आले होते. संगीत रजनीच्या कार्यक्रमामुळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू पदार्थ यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (District Sales Exhibition) हिंगोली जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षा मार्फत दिनांक 22 ते 24 मार्च या कालावधीमध्ये जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या (District Sales Exhibition) प्रदर्शनाचे उद्घाटन हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सारस्वत यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रमोद सरकटे यांचा स्वराज संगीत रजनी हा सदाबहार गाण्यांचा रंगतदार कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी हिंगोली नगरीतून सर्वांनी सहभाग नोंदवून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
या (District Sales Exhibition) कार्यक्रमासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सारस्वत लेखाधिकारी मनोज पिनगाळे, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद बनसोडे , जिल्हा व्यवस्थापक मेकाले गलांडे काळे ,तालुका अभियान व्यवस्थापक राजू दांडगे, मिलिंद कुकडे, विष्णू खाडे,संतोष भोसकर, तालुका व्यवस्थापक सिद्धार्थ पंडित, तानाजी काळे, स्मिता कटके, उज्वला गायकवाड, प्रकाश धुळे व सर्व उमेद कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रकाश मगरे प्रभाग समन्वयक यांनी व सर्व उमेद टीम यांनी परिश्रम घेतले.





