सत्संग कार्यक्रमात हजारो शिष्यांनी शांततेने उपस्थित राहून अध्यात्मिक लाभ घेतला!
मानोरा (Sant Rampal Ji Maharaj) : संत रामपाल जी महाराज यांनी ‘अन्नपूर्णा मोहिम’ राबवून समाजसेवेचे एक नवे पर्व सुरू केले आहे. या मोहिमेचा रोटी, शिक्षा, कपडा और मकान, हर गरीब को देगा कबीर भगवान ‘ असा सुंदर नारा त्यांनी नाव दिले आहे.
समाजसेवा, अध्यात्म आणि मानवतेचे एक जिवंत उदाहरण!
या उपक्रमांतर्गत संत रामपालजी महाराज यांच्या अशा गरजू लोकांना घरे बांधून दिली, की ज्यांना राहायला आसरा नव्हता, जे रोज रात्री फक्त पाण्यावर दिवस काढत होते. अनेक अशा कुटुंबांना त्यांनी सुरक्षित निवारा दिला आणि नव्या आयुष्याची दिशा दाखवली. ज्या मुलांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेता येत नव्हते, अशा विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळवून दिला आणि त्यांच्या शिक्षणासाठी लागणारे सर्व साहित्यही उपलब्ध करून दिले. खऱ्या अर्थाने संत रामपालजी महाराज हे त्या मुलांच्या आणि त्यांच्या परिवारांच्या आयुष्याचे सहारे बनले आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यापर्यंत ते त्यांच्या सोबत आधार बनून राहत आहेत.
इतिहासात पहिल्यांदाच, हरियाणाचा अभिमान असलेल्या आणि संपूर्ण राज्याच्या भावना व्यक्त करणाऱ्या “महाम चौबिसी खाप पंचायत” कडून जगत तारणहार संत रामपाल जी महाराज यांना १२ ऑक्टोबर रोजी भव्य सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्या मसीहाला आहे, ज्यांनी पूरग्रस्त गावे, शेतकरी आणि गरीब लोकांचे दुःख कमी करण्यासाठी अतुलनीय सेवा केली. संत रामपालजी महाराज हे खरेच परमेश्वराचे अवतार बनून या पृथ्वीवर आले आहेत. जे कार्य सरकारला शक्य होत नाही, ते कार्य ते स्वतः करून दाखवत आहेत. त्यांचे गुण आणि कार्य कितीही सांगितले तरी कमीच पडतील. सत्संग कार्यक्रमात हजारो शिष्यांनी शांततेने उपस्थित राहून अध्यात्मिक लाभ घेतला. शिष्यांसाठी चहा-बिस्किटची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
हा कार्यक्रम केवळ एक सत्संग (Satsang) नव्हता, तर समाजसेवा, अध्यात्म आणि मानवतेचे एक जिवंत उदाहरण होता. असे त्यांचे परम भक्त प्रकाश जाधव यांनी माहिती देताना सांगितले.