धार्मिक विधी नंतर पालखीची सांगता!
रिसोड (Sant Satarkar Maharaj) : रिसोड येथील श्री संत सातारकर महाराज (Shri Sant Satarkar Maharaj) पुण्यतिथि निमित्त संस्थानतर्फे 19 जून रोजी शहरातील सातारकर महाराजांच्या पालखीची नगर प्रदक्षिणा (Circumambulation) केली गेली. दुपारी 12:00 वाजता पालखी संत सातारकर महाराज मंदिरातून निघत अष्टभुजा देवी चौक मुल्लागल्ली, आसन गली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीन सराफा लाईन, चांदणी चौक, जुनी सराफा लाईन, पंचवट मार्गे मंदिरात पोहचली, तेथे धार्मिक विधीनंतर (Religious Rituals) पालखीची सांगता करण्यात आली. यावेळी भक्तिगीते आणि भक्तांच्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले होते. पालखीचे (Palanquin) दर्शन घेण्यासाठी शहरातील भक्त रस्त्यावर आले. या पालखीत महिला मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या.