कन्हान (ATM Card Fraud) : शहरातील एसबीआई एटीएम मध्ये दोन अनोळखी इसमांनी एटीएम कार्डची अदला बदल करुन महिलेच्या बैंक खात्यातुन ६०,००० रुपये काढुन महिलेची फसवणुक (ATM Card Fraud) केल्याने पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवार (दि.१२) जुलै ला दुपारी शालीनी नंदकीशोर देशभ्रतार वय ४४ वर्ष रा. इंदिरा नगर कन्हान ही घराचे बांधकाम करित असुन पैश्याची गरज असल्याने एसबीआई एटीएममध्ये (ATM Card Fraud) पैसे काढ ण्याकरिता गेली. एटीएमचा आत प्रवेश केला असता दोन इसम दिसुन आले. महिलेने त्यांना विचारले की पैसे कसे काढायचे आहे, एटीएम कसा मशीन मध्ये टाकायचा आहे. त्यावर इसम म्हणाला की ठिक आहे एटीएम माझे जवळ दया मी पैसे काढुन देतो.
महिलेने त्याला आपले एटीएम दिले, त्याने (ATM Card Fraud) एटीएम मशीन मध्ये टाकुन परत बाहेर काढले व दोन ते तीन वेळा त्याने तसेच केले व महिलेला म्हटले की पैसे निघत नाही आहे. तुमचा एटीएम घ्या असे म्हणुन तो इसम निघुन गेला. दुसऱ्या इसमाने पैसे काढण्यासाठी मदत केली परंतु पैसे निघले नाही. नंतर तो इसम सुध्दा तेथुन निघुन गेला. त्यावेळी महिलेला पैसे विडॉलचे मोबाईल वर मॅसेज आले. इसम समोर असतांना तो पैसे काढ तांनी दिसला नाही व एटीएमची अदलाबदली करून तो पळुन गेला.
कोणीतरी अज्ञात इसमांनी एटीएमचा उपयोग करून महिला जवळुन एटीएम चा पिन माहीत करून खात्यातुन एकुण ६०,००० रुपये काढले. महिलेने बँके त जावुन चौकशी केली असता बँकेचे खात्यातुन ६०,००० रुपये निघाल्याचे सांगितले. अज्ञात दोन ईसमांनी एटीएम ची अदला बदल करून महिले जवळु न एटीएम चे पिन घेऊन खात्यातुन ६०,००० रुपये काढुन फसवणुक (ATM Card Fraud) केल्याने कन्हान पोलीसांनी महिले च्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .